शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ४७ विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

कोठार : तळोदा पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी सहभागी न होता पालिकेमार्फत सुरू असणाऱ्या विकासकामांध्ये ...

कोठार : तळोदा पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी सहभागी न होता पालिकेमार्फत सुरू असणाऱ्या विकासकामांध्ये गैरव्यवहार व टक्केवारीचे आरोप करत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर लाक्षणिक उपोषण केल्याने ही सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली. नगरपालिकेच्या घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सर्व ४७ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

तळोदा नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला नगरसेवक योगेश पाडवी, सुरेश पाडवी, अंबिका शेंडे, सुनयना उदासी, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, सुरेश पाडवी, सविता पाडवी, अमानुद्दीन शेख, हेमलाल मगरे, काँग्रेसचे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र सूर्यवंशी, अनिता परदेशी, कल्पना पाडवी आदी उपस्थित होते. या सभेमध्ये उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्यासह नगरसेवक रामानंद ठाकरे, भास्कर मराठे, नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर आदी सभेमध्ये सहभागी झाले नाही. मुख्याधिकारी सपना वसावे यांनी सभेचे कामकाज पाहिले. कोरोना कालावधीनंतर प्रथमच सभा ऑनलाइन न घेता सभागृहात घेण्यात आली.

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी सभेच्या अजेंड्यावरील विषयावर चर्चा केली. एकूणच या सभेच्या अजेंड्यावर ४७ विषय घेण्यात आले होते. यात ईपीएफ सल्लागाराची निवड होणे, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शासन निर्णय व मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने खर्च करण्यास मंजुरी मिळणे, नगरपरिषद कार्यालयातील विविध विभागासाठी कुशल, अकुशल व अर्धकुशल कामगार पुरवण्याची निविदा रद्द करणे व पुरविणे याबाबत विचार विनिमय करणे, स्वच्छतेबाबत भिंतींवर रंगकाम, घोषवाक्य, सुविचार व डिजिटल बॅनर इत्यादी अनुषंगिक खर्चास मंजुरी देणे, आमदार निधीतून शहादा रोड येथे साऊंड सिस्टिम बसविण्यात येणाऱ्या खर्चास मंजुरी मिळणे, नगरपरिषदेच्या नूतन इमारतीमध्ये ऊर्जा संवर्धनासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणे व पाणीपुरवठा योजनांसाठी ऊर्जा बचतीसाठी सयंत्र स्थापित करण्यास मंजुरी मिळणे, तळोदा नगरपरिषद कार्यालयांमध्ये दस्तऐवज सुरक्षित जतन करण्यासाठी ॲडव्हान्स डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टिम स्थापित करणे, तळोदा नगरपरिषद हद्दीचा विकास आराखडा भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे तयार करणे, नगररचना अधिकारी तथा सहायक संचालक नगर रचना विभाग, शाखा नंदुरबार यांना विकास योजना तयार करण्याच्या कामात सहकार्य करण्यासाठी अनुभवी कंत्राटदार, शासकीय, निमशासकीय संस्थांकडून निविदाद्वारे नेमणूक करण्याबाबत येणाऱ्या खर्चास मंजुरी मिळणे, आरोग्य निरीक्षक यांच्या रिपोर्टनुसार साइंटिफिक अल लांडफिल्ल प्रकल्प उभारणेबाबत विचार विनिमय रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या विकास कामांना मंजुरी मिळणे, सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्यांचा पगार देणेबाबत आमदार निधीतून कार्यालयीन कामकाज या करता संगणक संच व संगणक साहित्य खरेदी करणे, माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्युत वाहनांना प्रोत्साहित चार्जिंग पण उपलब्ध करून देणे, गिरीधर आप्पा नगर व चाणक्यपुरी नगरमधील मोकळ्या जागेत सामाजिक सभागृह बांधकाम करणे, आदींसह शहरातील विविध प्रभागांत पायाभूत विकास कामांच्या ठरावांना या सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

दरम्यान ठराव क्रमांक ४४ नुसार तळोदा नगरपरिषदेच्या नवीन व्यापारी संकुल क्रमांक एकला 'राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व्यापारी संकुल' व्यापारी संकुल क्रमांक दोनला 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल' व व्यापारी संकुल क्रमांक तीनला 'संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज व्यापारी संकुल' असे नाव देणे, सोबतच प्रभाग क्रमांक दोनमध्ये नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी यांनी स्वखर्चातून उभारलेल्या बगिच्याला तळोदा शहराचे प्रथम नगराध्यक्ष 'कै गोविंद दीनाराम राठोड' हे नाव देण्याचे ठराव पालिकेच्या या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला व त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

तळोदा शहरातील महत्त्वाच्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सोलर पथदिवे बसविण्याच्या कामाला मुदतवाढ देणे, शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी एजंटची नेमणूक करणे इत्यादी विषयावर आयत्या वेळच्या विषयांमध्ये चर्चा करण्यात आली. दरम्यान स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी सभेचे अध्यक्ष नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी स्थापना वसावा यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे व्यापारी संकुलांना राष्ट्रपिता महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत जगनाडे महाराज याचे नावच केल्याबद्दल त्यांनी पालिकेचे आभारदेखील मानले.

सभा यशस्वीतेसाठी सभा लिपिक नितीन शिरसाठ, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, लेखापाल विशाल माळी, संगणक अभियंता सचिन पाटील, बांधकाम अभियंता शंकर गावीत, नगररचना विभागाचे विनीत काबरा, आरोग्य विभागाचे अश्विन परदेशी यांनी परिश्रम घेतले.