शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

४५ वनजमीनधारकांना जमिनीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी ४५ वनअतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीच्या ताबा पावत्या येथील महसूल प्रशासनाकडून देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी ४५ वनअतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीच्या ताबा पावत्या येथील महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या. याप्रसंगी गेल्या ४० वर्षाच्या लढ्यानंतर प्रत्यक्ष जमिनींचे कागदपत्र मिळाल्याने या वनपट्टेधारकांनी आनंद व्यक्त केला होता. दरम्यान जे प्रलंबीत दावे आहेत त्यावरही तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा वनजमीन अतिक्रमणधारकांनी केली आहे. जिल्ह्यातील दाव्यांपैकी अजूनही २६ हजार दावे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.येथील महूसल प्रशासना व पिंपरपाडा वनसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुक्यातील सोरापाडा येथे बुधवारी संबंधितांचे वनजमिनींचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते डाॅ.कांतीलाल टाटीया, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, उपविभागीय वनसमितीचे सदस्य दाज्या पावरा, पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, छगन कोठारी, यशवंत पाडवी, सरपंच वासुदेव वळवी, माजी सरपंच नारायण ठाकरे, नायब तहसीलदार बी.व्ही. अहिरराव, मंडळ अधिकारी एस.एम. पाडवी, सुरेश भांगा पाडवी, वीरसिंग पाडवी, नारायण बागले, वासुदेव नाईक, गुड्डू वळवी, तलाठी एस.वाय. जठारे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते परिसरातील ४५ वनजमीन अतिक्रमणधारकांना आपल्या जमिनीचा मालकी हक्क देण्यात आल्याने ते भारावले होते. या वेळी आमदार पाडवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अतिक्रमणधारकांनी ते दावे प्रशासनाने दाखल केले आहे. त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करावी. जेणे करून त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटीराहणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी वनदाव्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांची संपूर्ण माहिती मी घेतली आहे. साधारण ७६० हेक्टर जमीन महसुली झाली आहे. यावरील पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभाग व उपमुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून प्रत्यक्ष शिष्ट मंडळच नेणार आहे, असे सांगून माझ्या राहिलेल्या कालावधीत शहादा-तळोदा तालुक्यातील संपूर्ण वनजमीन अतिक्रमणधारकांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डाॅ.कांतीलाल टाटीया, नागेश पाडवी, यशवंत पाडवी, दाज्या पावरा यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पिंपरपाडा वनसमितीचे अध्यक्ष कांतीलाल पाडवी यांनी केले. सूत्रसंचालन कांतीलाल वळवी तर आभार लक्ष्मण पाडवी यांनी मानले.