शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाच्या बँंक खात्यातून ‘अज्ञात ठगा’ने ४४ हजार परस्पर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:33 IST

सायबर गुन्हा : म्हसावद येथील व्यापाऱ्याची फसवणूक

नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर ४४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे़ ७२ वर्षीय वृद्धास थेट बँकेचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ म्हसावद परिसरात ही सलग दुसरी फसवणूकीची घटना आहे़म्हसावद येथील केसरीमल बाबुलाल बेदमुथा यांना ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शहादा येथील स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे काढले गेल्याची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारे मिळाली होती़ त्यांनी याबाबत बँकेंत संपर्क केला असता, गोंदिया येथील दिपक आॅटो मोबाईल या नावाने ४४ हजार ४०० रुपये वर्ग करण्यात आल्याचे समजून आले़ बँकेने दिलेल्या माहितीनंतर बेदमुथा यांनी तात्काळ म्हसावद पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली आहे़ हा प्रकार आॅनलाईन ठगाकडून करण्यात आल्याची माहिती असून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान शहादा तालुक्यातील रायखेड येथील तनवीर शहाबुद्दीन कुरेशी यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन बँक खाते व एटीएम पीन विचारला होता़ यातून २७ एप्रिल रोजी त्यांच्या बँक खात्यातून सायंकाळी ९० हजार २०० रुपये अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतले होते़ याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ शहादा तालुक्यासह मध्यप्रदेश सिमेलगतच्या गावांमध्ये बँक अधिकारी असल्याची बतावणी करत दरदिवशी अनेकांच्या मोबाईलवर अज्ञात ठग संपर्क करत असल्याची माहिती समोर आली आहे़ इंग्रजी किंवा हिंदीत बोलून बँक खात्याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे़ यातून परस्पर पैसे काढले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत़ ग्रामीण भागातील नागरिक ठगांच्या भूलथापांना बळी पडत असल्याने पोलीस दलाकडून याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़