लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रविवारी येथे झालेल्या महाआरोग्य तपासणी शिबिरात 412 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांना पुढील संदर्भसेवा दिली जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, रेल्वे हॉस्पीटल नंदुरबार व जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते झाले. यावेळी वसई येथील जिल्हा न्यायाधीश श्रीरंग खैरनार, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, नंदुरबार रेल्वेचे जी.एस.गहलोत, मचर्ंट बँकेचे चेअरमन किशोरभाई वाणी, रोटरी नंदनगरी चे अध्यक्ष शब्बीर मेमन, सचिव प्रितिश बांगड आदी उपस्थित होते. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हाडांचा ठिसूळपणा तपासणे, पोटांचे आजार, रक्तगट तपासणी आदी सर्व रोगांचे निदान करण्यात आले. डॉ.जीगर पटेल, डॉ.अविनाश वानखेडे, डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.सादीक शेख, डॉ.प्रतिक्षित महाजन, डॉ.स्वप्नील जैन, डॉ.अनिकेत नागोते, डॉ.एम.डी. महाजन यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. जिल्हातील 412 गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला.खासदार डॉ.हिना गावीत यांनी नंदुरबारात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून त्यात अशा तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्यासाठी प्रय} राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी तर आभार नागसेन पेंढारकर यांनी मानले. शिबिरासाठी सचिव प्रितिश बांगड, प्रोजेक्ट चेअरमन आकाश बेदमुथा, निलेश तंवर, जितेंद्र सोनार, जय गुजराथी, प्रेमानंद इंदिस, मनोज गायकवाड, शितल पटेल, जितेंद्र पाटील, गिरीश जैन, महेंद्र झंवर, राजन सिंग चंदेल, वसंत रावल, दिनेश साळुंखे, प्रवीण येवले, विजय मंगलानी, संदीप गावीत, विकी जैन, इसरार सैयद, प्रदीप सोनार, सॅमूवेल लवणे, हाकीम लोखंडवाला, रवी नानकानी, डॉ. अजय शर्मा, नंदू सोनी आदींनी परिश्रम घेतले.
महाआरोग्य शिबिरात 412 रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:02 IST