कोरोनामुळे उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम झाला होता. लाॅकडाऊनमुळे अनेकांचा रोजगारही गेल्याचा प्रकार समोर आला होता. यातून उद्योजक आणि बेरोजगार अशा दोघांचा प्रश्न एकाच वेळी सोडवण्यासाठी पोर्टल व ॲप सुरु करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्याचे कामकाज हे औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात आले आहे. परंतू संबधित अधिका-यांचे लॉगिन हे तांत्रिक कारणामुळे बंद पडले असल्याने नेमक्या किती जणांनी नोंदणी केली याचा आकडा समोर आलेला नाही. गेल्या आठवड्यापर्यंत मात्र ४००जणांची नोंदणी पूर्ण झाली असून यातील किती जणांना रोजगार मिळाला याची माहिती मात्र उपलब्ध नाही. दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अमित भामरे यांच्यासोबत संपर्क केला असता, तांत्रिक अडचणींमुळे माहिती दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ४०० जणांनी केली महाजॉब्ज पोर्टलवर नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST