शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसेस एकमेकांवर धडकून 37 प्रवासी जखमी

By admin | Updated: July 5, 2017 13:01 IST

ठाणेपाडा गावाजवळील घटना : जखमींवर नंदुरबार येथे उपचार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.5-साक्री ते नंदुरबार रस्त्यावर ठाणेपाडा गावाजवळ दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन 37 प्रवासी जखमी झाल़े ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आह़े   
मंगळवारी दुपारी नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील वनविभागाच्या रोपवाटिकेच्या पुढे वळणावर वडाच्या झाडाजवळ नंदुरबार आगाराची बस एमएच 20- बीएल 9517 साक्रीकडे जात होती़ याचदरम्यान नाशिक-नंदुरबार बस क्रमांक एमएच 14-बीटी 4504 आली़ वळणावर आलेल्या या बसने साक्री बसला थेट धडक दिल्याने मोठा आवाज झाला़ समोरून धडकलेल्या दोन्ही बसच्या काचा रस्त्यावर पडल्या, तर आतील प्रवासी जखमी झाल़े  
या धडकेत दोन्ही बसमधील संजय दामोदर ओगले, सुकलाल ब्रिजलाल ठाकरे, इंदूबाई भीमराव महिरे, भगवान श्रीपत सोनवणे, शेख बिलाल मुस्तफा, अब्दुल्ला  शेख, मोहम्मद जावेद अब्दुल रशीद, दिनेश नाना, योगिता रमेश अहिरे, रामकृष्ण लकडू लोहार, सुनील चिंधू ठाकरे, सुकलाल शिवाजी सोनवणे, स्वपAील संतोष पटेल, दिव्या संतोष पटेल, सागर संजय सामुद्रे, अब्दुल कादिर शकूर रंगरेज, संजय भाईदास पाटोळे, मनेश दिवाल्या राऊत, प्रकाश रामसिंग वसावे, शेख जावेद  अब्दुल रशीद, रंगरेज अब्दुल कादिर, शरद मोहन मुसळदे, ब्रिजलाल सुन्या ठाकरे, राज जितेंद्र चौधरी, नरेंद्र बाबूराव मराठे, दिनेशपुरी गोसावी, समाधान हिरामण सोनवणे,  सुभद्राबाई दामोदर ओगले, निशाबाई संजय ओगले, योगिता संजय ओगले, ललित संजय ओगले, बसचालक बबन दत्तात्रय खैरनार असे एकूण 37 प्रवासी जखमी    झाल़े  
संजय ओगले यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक-नंदुरबार बसचा चालक बबन दत्तात्रय खैरनार, रा़सटाणा याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े