शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आगीत होरपळून 35 जनावरांचा मृत्यू माळखुर्द येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक           झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी ...

ठळक मुद्देकर्मचा:यांनी पायपीट करीत केला पंचनामा घराला लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती फुलसिंग वसावे यांनी तालुका प्रशासनास कळविल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने तलाठी डी.बी. हाडे, पशुवैद्यकीय अधिकारी सुनील गोस्वामी व इतर कर्मचा:यांना पंचनाम्यासाठी पाठवि

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गोठय़ात लावलेल्या चिमणीचा भडका उडून लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक           झाले. गोठय़ात बांधलेली 35 जनावरे या आगीत मृत्युमुखी पडले. याशिवाय 32 हजारांची रोकडसह 90 क्विंटल धान्य व संसारोपयोगी वस्तू जळाल्यात. साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत मानवहानी झाली नाही. ही घटना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माळखुर्द या पाडय़ात घडली.मिळालेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील माळखुर्द या पाडय़ातील फुलसिंग रामा वसावे यांच्या घराजवळील गोठय़ात रात्री चिमणी लावली होती. या चिमणीचा             भडका रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उडाला. त्यात आगीने पेट घेतल्याने गोठय़ा बरोबरच घराला आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा व घरही जळून खाक झाले. या वेळी गोठय़ात बांधलेली चार बैले, एक दुधाळ गाय, एक गो:हा, 15 शेळ्या, 15 कोंबडय़ा अशी 35 पाळीव जनावरे त्याच बरोबर 90 क्विंटल धान्य. यात भगर, ज्वारी, भुईमूग, तुवर दाळीचा समावेश होता. याशिवाय कपाटात ठेवलेली 32 हजारांची रोकड व संसारोपयोगी वस्तूही जळून खाक झाल्या आहे. शेतात एकांतात घर असल्यामुळे आजू-बाजूचे रहिवाशी आग विझविण्यास येईपावेतो संपूर्ण    पाळीव प्राणी आगीच्या भस्मात मृत्यूमुखी पडले होते. सुदैवाने या दुर्घटनेत मुनष्यहाणी झाली नाही.  मात्र आपल्या डोळ्यादेखत मोठय़ा कष्टाने कमवलेली कमाई अन् पाळीव जनावरे आगीत भस्म झाल्याने फुलसिंग वसावे यांनी अक्षरश: हंबरडा फोडला होता. त्यांचा संसार उघडय़ावर आल्याने शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.