लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी किंवा तालुक्यात राहणा:या पोलीस कर्मचा:यांना अखेर दुस:या ठिकाणी हलविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील 344 पोलीस कर्मचा:यांच्या बदल्या केल्या असून त्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचा:यांनी वर्षानुवर्ष एकाच पोलीस ठाण्यात किंवा एकाच तालुक्यात ठाण मांडले होते. अशा कर्मचा:यांचे परिसरात प्रस्थ देखील वाढले होते. ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी अशा कर्मचा:यांची आता उचलबांगडी केली आहे. तब्बल 344 कर्मचा:यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केलेल्या आहेत. यात पाच वर्ष सलग सेवा आणि 12 वर्ष एकाच तालुक्यात राहणा:या पोलीस कर्मचा:यांच्या समावेश आहे. रविवारी हे आदेश काढण्यात आले असून तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेशात म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कर्मचा:यांच्या बदल्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या अखेर रविवारी यादी जाहीर करून आदेश काढण्यात आले आहेत. बदल्या करतांना कुणावरही अन्याय होणार नाही शिवाय समतोल साधला जाईल याची ्रकाळजी पोलीस अधीक्षकांनी घेतल्याचे दिसून येते.
पाच सहायक बनले पोलीस निरिक्षक
जिल्ह्यात कार्यरत पाच सहायक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदी बढती देण्यात आली आहे. त्यात मुख्यालय, विसरवाडी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिका:यांच्या समावेश आहे. आज यासंदर्भातील आदेश काढण्यात आले. त्यात वाचक शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक राकेश चौधरी, विसरवाडीचे धनंजय पाटील, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक निरिक्षक संगिता पाटील, संतोष भंडारे, मुख्यालयातील योगेश कामाले, सुभाष जाधव यांचा समावेश आहे. या सर्व अधिका:यांना कोकण व इतर विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तातडीने त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.