शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनात 325 उपकरणांची मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:42 IST

शहादा : शहरातील श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण 325 उपकरणांचा समावेश होता. प्रदर्शनाचे उद्घाटन ...

शहादा : शहरातील श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण 325 उपकरणांचा समावेश होता. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.वसंत  पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन रमेश आसकरण जैन होते. शहादा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूल व शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान नगरीत हे प्रदर्शन भरविण्यात आले. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, प्राचार्य ए.एम. पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील, संस्थेचे संचालक अनिल  गांधी, समीर चोरडिया, केंद्रप्रमुख एस.आर. आहिरे, जी.एस. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी ममता पाटील, एम.एस. बंजारा, डोंगरगावचे उपसरपंच विजय पाटील व विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.डॉ.वसंत पाटील म्हणाले की, विज्ञानाची आवड विद्यार्थी दशेतच निर्माण झाली पाहिजे. नैतिक मूल्यमापन व निदान करून जीवन यशस्वीतेसाठी त्याचा उपयोग करावा. विज्ञान प्रदर्शनातून आरोग्य, स्वच्छता, संपत्ती यांची सुरक्षितता ठेवण्याचे काम केले पाहिजे, असे सांगितले. शिक्षणाधिकारी कदम म्हणाले की, आपले जीवनमान उंचाविण्यासाठी पृथ्वीचे संरक्षण होणे काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेचे विचार काळाची गरज आहे. विज्ञानामुळे जेवढे सुख आले आहे त्याचसोबत माणूसही आळशी झाला आहे. विज्ञानाचा प्रचार-प्रसार नसल्याने अंधश्रद्धेला अनेक लोक बळी पडत असल्याचे  त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील यांनी केले. तालुका विज्ञान प्रदर्शनात ‘जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय’ हा मुख्य विषय आहे. आरोग्य व स्वच्छता, संसाधन आणि व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन वाहतूक आणि दळणवळण, गणिते प्रकृती आदी विषयांना अनुसरून   प्राथमिक गटात 152, आदिवासी गटात नऊ, शिक्षक गटात दोन व परिसर गटात एक, माध्यमिक गटात 149, आदिवासी गटात दोन, शिक्षक गटात एक व परिसर गटात एक असे एकूण 325 उपकरणे मांडली आहेत. सूत्रसंचालन गणेश चौधरी यांनी तर आभार शारदा कुलकर्णी यांनी मानले.