शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात 32 हजार 554 मतदारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:34 IST

नंदुरबार : अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीनंतर जिल्ह्यात 32 हजार 554 नव्या मतदारांची भर पडली आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक महिला ...

नंदुरबार : अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीनंतर जिल्ह्यात 32 हजार 554 नव्या मतदारांची भर पडली आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक महिला मतदारांचा समावेश आहे. इतर दोन मतदारांचीही त्यात भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकुण 12 लाख दोन हजार 426 मतदार आहेत. दरम्यान, नव्याने मतदार नोंदणी व मतदार याद्यांमधील दुरूस्तीची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार 31 जानेवारी रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. या याद्यांची प्रसिद्धी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. नंदुरबार मतदारसंघात सर्वाधिकनवीन मतदार याद्यांनुसार नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार राहणार आहेत. पूर्वी या मतदारसंघात एकुण तीन लाख 23 हजार 706 मतदार होते. आता तीन लाख 32 हजार 261 मतदार आहेत. त्यात एक लाख 67 हजार 386 पुरुष तर एक लाख 64 हजार 869 महिला मतदार आहेत. इतर दोन मतदार देखील यात आहेत. वाढलेल्या मतदार यादीत एकुण आठ हजार 555 मतदार वाढले आहेत. त्यात चार हजार 36 पुरुष तर चार हजार 519 महिला मतदारांचा समावेश आहे.शहादा मतदार संघात पूर्वी तीन लाख दोन हजार 501 मतदार होते. आता तीन लाख 13 हजार 546 मतदार असतील. त्यात एक लाख 58 हजार 423 पुरुष तर एक लाख 55 हजार 119 महिला मतदार आहेत. इतर चार मतदारांचा देखील समावेश आहे. वाढलेल्या मतदार एकुण 11 हजार 45 आहेत. त्यात पाच हजार 208 पुरुष तर पाच हजार 835 महिला मतदार आहेत. इतर दोन मतदारांचाही समावेश आहे.  अक्कलकुवा मतदार संघात पूर्वी दोन लाख 65 हजार 106 मतदार होते. आता दोन लाख 72 हजार 972 मतदार राहणार आहेत. त्यात एक लाख 37 हजार 522 पुरुष तर एक लाख 35 हजार 449 पुरुष आणि एक इतर मतदार यांचा समावेश आहे. वाढलेले एकुण मतदार सात हजार 865 इतके आहेत. यात तीन हजार 941 पुरुष तर तीन हजार 924 महिला मतदार आहेत. नवापूर मतदार संघात पूर्वी दोन लाख 78 हजार 558 मतदार होते. आता दोन लाख 83 हजार 647 मतदार असतील. त्यात एक लाख 38 हजार 700 पुरुष तर एक लाख 44 हजार 946 महिला मतदार व एक इतर मतदार आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये एक हजार 931 पुरुष तर तीन हजार 158 महिला असे एकुण पाच हजार 89 मतदारांचा समावेश आहे.