शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 31 हजार शेतकरी मदतनिधीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:38 IST

बोंडअळीची बाधा : शासनाकडून 29 कोटी रूपयांचा निधी रखडला

नंदुरबार : जिल्ह्यात बोंडअळीमुळे 85 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यातील 54 हजार 817 शेतक:यांना शासनाने मदत वाटप केली असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आह़े परंतू अद्यापही 31 हजार शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असून गेल्या दोन आठवडय़ांपासून शासनाने जिल्हा प्रशासनाला 29 कोटी रूपयांची रक्कम वर्ग केलेली नसल्याने मदतीसाठी शेतकरी बँका आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत़नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांसाठी शासनाने 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांची मदत जाहिर केली होती़ ही मदत जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांना देण्यात येणार होती़ यानुसार गेल्या मे महिन्यापासून वाटपाचे कामकाज सुरू होत़े परंतू पाच महिने उलटूनही केवळ 54 हजार शेतक:यांनाच मदत मिळू शकलेली आह़े शासनाने दिलेला सर्व निधी वाटप झाल्यानंतर तात्काळ उर्वरित शेतक:यांसाठीचा निधी देणे गरजेचे असतानाही दोन आठवडे उलटूनही प्रशासनाला रक्कम प्राप्त झालेली नाही़ याचा परिणाम म्हणजे गेल्या दोन आठवडय़ांपासून शेतक:यांची फिरफिर सुरू झाली आह़ेबहुतांश शेतक:यांना मदत मिळाली असल्याने अनेकांनी तलाठी आणि तहसीलदार कार्यालयात तगादा लावला आह़े येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित 31 हजार शेतक:यांसाठी जाहिर झालेली 29 कोटी 89 लाख 22 हजार 145 रूपयांची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आह़े परंतू ठोस अशी माहिती नसल्याने त्यापुढील आठवडा उजाडण्याची स्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आह़े जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या 95 हजार 802 हेक्टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने तेथील शेतक:यांचा गेल्या वर्षाचा खरीप हंगाम हाताच गेला होता़ यंदाही पावसाने मेहेरनजर न दाखवल्याने पुन्हा दुष्काळी स्थितीचा सामना शेतक:यांना करावा लागत आह़े यात शासनाकडून प्रतीहेक्टर मिळणारी 6 हजार 800 ही रक्कम दिलासा देणारी ठरणारी होती़ गत चार महिन्यात शेतक:यांना मिळालेल्या रकमेमुळे अनेकांनी पुन्हा शेतीतच गुंतवणूक करत कापूस लागवड केला होता़ परंतू गत दोन आठवडय़ात रकमेचे वाटप थांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ कार्यालये आणि बँकांमध्ये भेटी देणा:या शेतक:यांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता अधिकारी कर्मचा:यांच्या नाकीनऊ आले आह़े नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 16 हजार 719 शेतक:यांना 21 कोटी 85 लाख 6 हजार 754 रूपयांची मदत वाटप झाली आह़े तालुक्यात 10 कोटी 92 लाख 53 हजार 379 रूपयांचे वाटप शिल्लक आह़ेनवापूर तालुक्यात 9 हजार 271 शेतक:यांना 5 कोटी 16 लाख 47 हजार 324 रूपयांचे वाटप करण्यात आले आह़े याठिकाणी अद्यापही 2 कोटी 87 लाख 4 हजार 816 रूपयांची मागणी आह़े अक्कलकुवा तालुक्यात 2 हजार 69 शेतक:यांना आजवर 97 लाख 80 हजार 802 रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आह़े येथे अद्याप 48 लाख 90 हजार 604 रूपयांच्या निधीची प्रतिक्षा आह़े सर्वाधिक 43 कोटी 92 लाख 49 हजार 618 मदत शहादा तालुक्यात जाहिर झाली होती़ यातील केवळ 29 कोटी 28 लाख 33 हजार 78 रूपये शासनाला प्राप्त झाले असून 24 हजार 159 शेतक:यांना ही मदत मिळाली आह़े या तालुक्यातून 14 कोटी 64 लाख 16 हजार 540 रूपयांची मागणी आह़े तळोदा तालुक्यात 2 हजार 107 शेतक:यांना 22 कोटी  49 लाख 94 रूपयांची मदत वाटप झाली असली तरी येथेही अद्याप 1 कोटी 12 लाख 45 हजार 48 रूपयांची गरज आह़े सर्वाधिक कमी 492 शेतकरी संख्या असलेल्या धडगाव तालुक्यात 22 लाख 39 हजार 640 रूपयांची मदत वाटप करण्यात आली आह़े येथे 12 लाख 41 हजार 960 रूपयांची गरज आह़े