शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५२ हजार शेतकऱ्यांना तिसºया टप्प्यातील ‘सन्मान’ची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:45 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या ९५० गावांमधून संकलित करण्यात आलेल्या १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांची नावे जिल्हा ...

 

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या ९५० गावांमधून संकलित करण्यात आलेल्या १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांची नावे जिल्हा प्रशासनाने पीएम-किसान पोर्टलवर फेब्रुवारी अखेरीस वर्ग केली होती़ यापैकी केवळ ५२ हजार शेतकºयांना पहिल्या दोन टप्प्यातील रकमेचा लाभ झाला असून उर्वरित १ लाख २० हजार शेतकरी योजनेपासूनच वंचित आहेत़पहिल्या दोन टप्प्यातील रक्कम मिळाल्यानंतर शेतकºयांना शेवटच्या टप्प्यातील रकमेची प्रतिक्षा होती़ परंतू बºयाच शेतकºयांच्या आधार कार्ड आणि बँक खातेक्रमांक यांच्यात दुरुस्त्या असल्याने त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास अडचणी येत होत्या़ परिणामी प्रशासनाने जिल्ह्यात सुरु असलेल्या २५७ कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांना प्रशिक्षण देत शेतकºयांची नावे दुरुस्ती करुन घेण्याचे आदेश काढले आहेत़ याठिकाणी गेल्यानंतर शेतकºयांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन किसान योजनेसंबधी लिंक ओपन करुन आधार क्रमांक टाकून तपासणी करावयाची आहे़ आधारकार्ड प्रमाणे नाव आहे किंवा कसे हे तपासून घेत दुरुस्ती असल्यास ते अपडेट करुन घ्यावयाचे आहे़ दुरुस्ती असल्यास तहसील कार्यालयातील दुरुस्ती केंद्रात दुरुस्ती करुन देण्यात येणार आहे़ दुरुस्ती प्रक्रिया व नवीन नोंदणीसाठी लाभार्थीला नाममत्र शुल्क लाभार्थीला द्यावे लागणार आहे़ याप्रक्रियेनंतर शेतकºयांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़यानुसार कामकाजाला गती मिळाली असून उर्वरित काळात सर्वच शेतकºयांची नावे पीएम-किसान पोर्टलवर पुन्हा नव्याने वर्ग होऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे़ ५२ हजार शेतकºयांना पहिल्या दोन टप्प्यात रक्कम मिळाली असताना जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकºयांनाही आधार आणि बँक खाते संदर्भातील त्रुट्या पीएम किसान पोर्टलवर दिसून येणार आहेत़ या दुरुस्त्या तातडीने झाल्यानंतर या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे़४जिल्ह्यात नमुना आठ नुसार १ लाख ७६ हजार ५९५ शेतकरी आहेत़ फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या ग्रामस्तरीय समित्यांनी ७२ हजार ७७१ कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले होते़ या कुटूंबांच्या प्रमुखाच्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे निर्धारित करण्यात आले होते़ परंतू आजअखेरीस केवळ ५२ हजार शेतकºयांच्या खात्यावर पहिल्या आणि दुसºया टप्प्याचे अनुदान वर्ग झाले आहे़४शासनाच्या सर्वेक्षणानुसार नंदुरबार तालुक्यात १५५ गावांमध्ये ४० हजार २२१ शेतकरी़४नवापुर तालुक्यात १६५ गावांमध्ये ४१ हजार ३५२ शेतकरी़४शहादा तालुक्यातील १८० गावांमध्ये ५१ हजार ६८९ शेतकरी़४तळोदा तालुक्यात ९४ गावात १६ हजार ९१९ शेतकरी़४अक्कलकुवा तालुक्यात १९४ गावांत १९४ गावांमध्ये १५ हजार ५६९ शेतकरी़४धडगाव तालुक्यात १६२ गावांमधील १० हजार ८५५ शेतकºयांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते़४सर्वेक्षणानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस काहींच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार रुपयांची रक्कम वर्ग झाली होती़ काही काळानंतर यातील काहींना दुसºया टप्प्यातील रक्कम मिळाली होती़१ लाख २० हजार ५९५ शेतकरी लाभार्थींच्या नोंदण्या होवूनही त्यांना किसान सन्मान योजनेतून मदत न मिळाल्याने त्यांच्याकडून सातत्याने तहसील कार्यालय, तलाठी, मंडळाधिकारी यांच्या भेटी घेण्यात येत आहेत़ बºयाच शेतकºयांची नावे, आधार कार्ड आणि बँकेची माहिती ही योग्य असल्याचा दावा करण्यात येत आहे़ यातून सर्वेक्षण नोंदणी दरम्यान चुकीची माहिती दिली गेली असावी असे शेतकºयांचे म्हणणे आहे़ यामुळे प्रशासनाने सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती घेऊन दुरुस्त्या करुन घ्याव्यात असे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़