शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मातृवंदना योजनेचा १८ हजार ७४७ महिलांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ७४७ महिलांना सहा कोटी ११ लाखाचे अनुदान देण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ७४७ महिलांना सहा कोटी ११ लाखाचे अनुदान देण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थाकडून लाभ देण्यात येत आहे.आरोग्यदायी राष्ट्र निर्मितीसाठी जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती मातांना गरोदरपणाच्या अखेरपर्यंत मजुरी करावी लागते. यामुळे अशा माता कुपोषित राहुन त्यांच्यांसह त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, नवजात बालकांचेही आरोग्यात सुधारावे आणि मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे.या योजनेचा दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसुतीपुर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीपासुन बाळाचे प्राथमिक लसीकरणपर्यंत संपुर्ण लसीकरणानुसार बँक खात्यात लाभ जमा केला जातो. सप्ताहादरम्यान जास्तीत जास्त नवीन लाभार्थी नोंदणी, आधार शिबीर, बँक खाते शिबीर घेतले जात आहे. अन्य महिलांना संबधित आरोग्य संस्थेकडून लाभ दिला जात आहे.या योजनेअंतर्ग राज्यातील गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. तीन टप्प्यांमध्ये पाच हजाराचा लाभ दिला जात असून यासाठी शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.