शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
2
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
3
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
4
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
5
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
6
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
7
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
8
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
9
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
10
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
11
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
12
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
13
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
14
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
15
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
16
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
17
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
18
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
19
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
20
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सामूहिक विवाह सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ शहादा-नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री संतसेना नाभिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ शहादा-नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री संतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी येथे सामूहिक विवाह सोहळा झाला. नाममात्र एक रुपया नोंदणी फी घेऊन या सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले.शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात गुजर नाभिक समाजाचा सातवा तर समाज सेवा मंडळातर्फे पहिला सामूहिक विवाह सोहळा झाला. या वेळी आमदार राजेश पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जि.प.चे शिक्षण सभापती अभिजित पाटील, बांधकाम सभापती जयश्री पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मराठा सेवा संघाचे समन्वयक श्यामभाऊ जाधव, अरुण चौधरी, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य मकरंद पाटील, पं.स. सदस्य शिवाजी पाटील, सुनील सखाराम पाटील, रवींद्र राऊळ, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.कांतीलाल टाटिया, डॉ.योगेश चौधरी, प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, नगरसेवक संजय साठे, आनंदा पाटील, नगरसेवक योगिता वाल्हे, वर्षा जव्हेरी, संतोष वाल्हे, नाना निकुंभ, विजय कदम, संजय राजपूत, अतुल जयस्वाल, दिनेश खंडेलवाल, डॉ.किशोर पाटील, दिलीप गांगुर्डे, यशवंत चौधरी, प्रा.लियाकत सैयद, नासीर पठाण, जितेंद्र जगदाळे, विनोद जैन आदी उपस्थित होते.सकाळी नऊ वाजता वरांची श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरापासून सजवलेल्या ट्रॅक्टरवरुन वरात काढण्यात आली. त्यानंतर ११ वाजता मोठ्या उत्साहात २६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश सहा ते सात हजार वºहाडी मंडळी उपस्थित होते. वधू-वरांसाठी स्वतंत्र स्टेज व त्यांच्या समोरच नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पुरोहित, फोटोग्राफर, व्हिडिओ चित्रीकरण, भोजनावळ, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, मंडपात सी.सी. टीव्ही कॅमेरा, वाहनतळ आदी सुविधा आयोजकांनी केल्या होत्या.दीपक पाटील म्हणाले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज असून नाभिक समाजाने वेळेवर विवाह लावून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून आदर्श निर्माण केला आहे. विजय चौधरी म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळा पद्धतीमुळे परिवार व समाजात एकोपा निर्माण होते. गुजर नाभिक समाजाने सामूहिक विवाह सोहळ्याचे सातत्य कायम ठेवावे, असे सांगितले. या सोहळ्यासाठी धर्मदाय आयुक्त, महिला बालकल्याण विभाग, समाजातील विविध गावातील संस्था, संघटना, तरूण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.अनिल साळुंके, व प्रा.हितेंद्र जाधव तर आभार प्रा.गणेश कन्हैया यांनी मानले. गुजर नाभिक समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संसारोपयोगी साहित्य, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. वृक्षाचे रोप देऊन नवदाम्पत्यांची बिदाई करण्यात आली.सोहळ्यासाठी आलेले वधू-वरांचे हजारो नातेवाईक शिस्तीने रांगेत बसले होते. हा सोहळा दोन दिवस असल्याने त्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ३६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.श्री महावीर सहकारी पतसंस्था, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्था, संत सेना नाभिक कारागीर पतसंस्था व श्यामभाऊ दिनकर जाधव व समस्त जाधव परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याला देणगी जाहीर करण्यात आली.