लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले असून मंगळवारी जिल्ह्यातील चारही केंद्रांवर एकुण २८५ जणांनी लस घेतली. चारही केंद्रांवर प्रत्येकी १०० जणांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी पहिला दिवस होता. आता मंगळवारी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. मंगळवारी चारही केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. प्रत्येकी १०० जणांचे असे ४०० जणांचे नियोजन करण्यात आले होते. नंदुरबार केंद्रात १०० जणांना, नवापूर केंद्रात ७४, म्हसावद केंद्रात ५१, अक्कलकुवा केंद्रात ६० जणांना असे एकुण २८५ जणांना लसीकरण करण्यात आले. आज देखील कुणालाही या लसीचा त्रास झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता राज्य शासनाच्या सुचनेनुसार आठवड्यातून चार दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
२८५ जणांनी घेतली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:32 IST