शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द

By admin | Updated: June 14, 2017 13:17 IST

नंदुरबार जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 14 - शिक्षक भरतीला शासनाची बंदी असताना तथा नियमबाह्य शिक्षक भरती केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील  28 शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.शिक्षक भरतीला 2012 मध्ये शासनाने बंदी केली होती. शिवाय याच काळात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्नही चर्चेत आला. त्यामुळे संस्थांमध्ये शिक्षक भरतीचा विषय गुंतागुंतीचा ठरला होता. अशी स्थिती असताना जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नियमबाह्य शिक्षक भरती झाल्याचे प्रकार शिक्षण उपसंचालकांच्या लक्षात आल्याने त्याबाबतची तपासणी सुरू होती. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात किती मान्यता दिल्या याचा अहवालही मागवला होता. त्यानुसार प्रकरणांची चौकशी होऊन गेल्या 24 ते 26 मे 2017 च्या काळात  नाशिक येथे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात संबंधित शिक्षकांची  व अधिका:यांची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर 28 शिक्षकांची मान्यता नियमबाह्य झाल्याचे निदर्शनास आले. ही भरती करताना शिक्षक भरतीमध्ये शिक्षण विभागाची परवानगी न घेणे, भरतीची जाहिरात न देणे, भरतीत आरक्षण डावलून पदांना मान्यता देणे, अतिरिक्त शिक्षकांची संख्या तसेच त्यांचे प्रश्न विचारात न घेताच शिक्षक भरती करणे आदी विविध प्रकार समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील 28 शिक्षकांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. याशिवाय अल्पसंख्याकाच्या नावाखाली करण्यात आलेल्या भरतीतही बंधने डावलून भरती केल्याचा आक्षेप आहे. एकूणच नियमबाह्य भरतीचे प्रकार जिल्ह्यात समोर आले असून इतरही शिक्षकांची सुनावणी उपसंचालकांच्या कार्यालयात होणार आहे.दरम्यान, 28 शिक्षकांची भरती नियमबाह्य झाल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिल्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी त्याबाबतची अंमलबजावणी सुरू केली आहे.