लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील एकाच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर बँक खात्यातून 27 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान झालेल्या फसवणूकीप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ इम्रान याकूब पिंजारी यांना 9 सप्टेंबर रोजी अज्ञात खात्यावरुन किरकोळ रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला होता़ याच्या काही वेळाने पुन्हा खात्यातून काही रक्कम काढून घेतल्याचा मेसेज आला होता़ यामुळे त्यांनी बँकेत चौकशी केली असता खात्यावरुन 27 हजार 560 रुपये टप्प्याटप्प्याने काढल्याचे दिसून आल़े अज्ञात व्यक्तीने पेटीएम व्यवहाराद्वारे ही रक्कम खर्च केल्याचे दिसून आल्यानंतर पिंजारी यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल आह़े
एकाच्या खात्यातून 27 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:49 IST