शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील शेतक-यांना 26 कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 12:54 IST

47 टक्के कर्ज वाटप : साडेतीन हजार शेतक:यांना मिळाली रक्कम

नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून यंदा दोन्ही जिल्ह्यातील 18 हजार शेतक:यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन होत़े यात  खरीप पेरण्यांना सुरुवात होऊनही सुधारण झाली नसून नंदुरबार जिल्ह्यात केवळ साडेतीन हजार शेतक:यांना कजर्पुरवठा होऊ शकला आह़े खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी यंदा जिल्हा बँकेकडून 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार जिल्ह्यात बँकेच्या 28 शाखांसह 205 विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज वाटप करण्यात येत आह़े जून महिना उजाडल्याने या वितरणाला वेग येण्याची चिन्हे असताना मात्र जिल्ह्यात कर्ज वाटप संथगतीने सुरू आह़े बँकेने तत्काळ कर्ज वाटपास मंजुरी दिली असली तरी शेतक:यांना ऑनलाइन सातबारा आणि इतर कागदपत्रे मिळत नसल्याने तलाठय़ांकडे त्यांच्या फे:या सातत्याने वाढत आहेत़ खरीप कर्ज वाटप सुलभ व्हावे यासाठी जिल्हा बँकेने विविध कार्यकारी संस्थांना यंदा एप्रिलपूर्वीच सूचना केला होत्या़ यात नंदुरबार 59, शहादा 60, तळोदा 14, अक्कलकुवा 3, तर नवापूर तालुक्यातील 25 संस्थांनी कर्ज वाटपाची तयारी दर्शवली होती़ यासोबत 28 शाखांमधून पीक कर्ज वाटप सुरू झाले होत़े यंदा जिल्ह्यातील 5 हजार 796 शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक बँकेने नंदुरबार जिल्ह्यासाठी निर्धारित केला होता़ यानुसार 8 जूनर्पयत नंदुरबार 1 हजार 318, शहादा 1 हजार 581, तळोदा 198, अक्कलकुवा 23, तर नवापूर तालुक्यातील 578 अशा एकूण 3 हजार 598 शेतक:यांना 26 कोटी 65 लाख 46 हजार रुपयांच्या पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आह़े निर्धारित लक्ष्यांकाच्या केवळ 47 टक्के शेतक:यांना आतार्पयत पीक कर्ज वाटप झाले आह़े पीक कर्जासाठी सध्या शेतकरी सकाळपासून बँका आणि सोसायटीकडे संपर्क करत असले तरी या शेतक:यांना ऑनलाइन सातबारा मिळत नसल्याने त्यांच्या कर्ज प्रक्रियेत अडथळे येत आहेत़ यात सुधारणा झाल्यास शेतक:यांना कर्ज मिळणे सुलभ होणार आह़े जिल्ह्यात बँकेने 26 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असतानाच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची स्थिती सुधारत असल्याचे चित्र आह़े जिल्ह्यात आजअखेरीस 10 हजार 370 शेतक:यांना शासनाकडून 32 कोटी 75 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती आह़े यासाठी दीड लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतक:यांचे कर्ज माफ होऊन शेतक:यांकडून कजर्माफीतील काही रकमेचा भरणाही करण्यात आला आह़े योजनेसाठी जिल्हा बँकेच्या 26 शाखांसह 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध 63 शाखांमध्येही कजर्माफीच्या परताव्याची रक्कम शेतक:यांच्या खात्यांमध्ये वर्ग झाली आह़े जिल्हा बँकेच्या शाखांसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांमधूनही अद्याप केवळ 4 हजार शेतक:यांना कर्ज वाटप झाल्याची माहिती आह़े या कर्ज वाटपासाठी शेतक:यांना बँकांकडून कळविण्यात आले होत़े शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कर्ज वाटपाला वेग आह़े राष्ट्रीयकृत बँकांनी तब्बल 37 कोटी रुपयांर्पयत कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े अद्याप अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणा:या आढावा बैठकीत याबाबत खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े अग्रणी बॅकेकडून आकडय़ांची जुळवाजुळव सुरू होती़