शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेच्या सभेत २५ विषयांना मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे झालेल्या  तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २६ पैकी २५ विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :  व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारेझालेल्या  तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २६ पैकी २५ विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. एक विषय स्थगित करण्यात आला बुधवारी झालेली ही सभा अवघ्या २० मिनिटात  आटोपण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी हे होते. मुख्याधिकारी सपना वसावे यांनी सभेचे कामकाज पाहिले.सभेला उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, योगेश पाडवी,अंबिका शेंडे, सुनयना उदासी, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, भास्कर मराठे, सुरेश पाडवी, सविता पाडवी, अमानुद्दीन शेख, काँग्रेस चे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र सूर्यवंशी,अनिता परदेशी, कल्पना पाडवी उपस्थित हाेते.  कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या सभा या व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने तळोदा पालिकेची सभा घेण्यात आली.  सभेत नगरसेवकांनी सभेच्या विषयांवर चर्चा केली.  यात २५ विषय मंजूर करण्यात आले. यात आंबेडकर चौकातील मोठ्या जागेत संत श्री सूरदास महाराज सभागृह बांधणे, विमल नगर मधील ज्येष्ठ नागरिक भवनाला  स्व. अरुण वडाळकर असे नामकरण करणे, मीरा गोपाळ नगरमधील लॉन्सला स्व.श्री.गोपीनाथ मुंडे असे नामकरण करणे, नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रमुख चौक कॉलनी व गल्ली यांना एलईडी डिजिटल फलक लावणे,  प्रभाग क्रमांक १,३ व ५ या परिसरात विंधनविहिर करणे यासह इतर विषय मंजूर करण्यात आले. व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमाने सर्वसाधारण सभा यशस्वी व्हावी यासाठी  नगराध्यक्ष व नगरसेवकांना पहिल्या सर्वसाधारण सभेच्या आधीच प्रशिक्षित तज्ञ इंजिनिअरने प्रशिक्षण दिले. पहिल्या सभेत अनेक अडचणी आल्या असल्याचे विरोधी नगरसेवकांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे  दुसऱ्या ऑनलाईन सभेत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सभेत सहभागी होणे टाळले.काँग्रेस नगरसेवकांचा हिरमोड काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालिकेची सर्वसाधारण सभा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता पालिकेच्या मोकळ्या पटांगणात घेण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे केली होती. परंतु कोराेनामुळे हे शक्य होणार नाही व शासनाच्या नियमाप्रमाणेच ही सभा ही ऑनलाईन च घेण्यात येईल सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला होता.