शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या 23 दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:55 IST

पाच जणांवर गुन्हा : पोलिसांच्या विविध पथकांनी केली जिल्हाभरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये झालेले वाढ लक्षात घेता पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेता पोलिसांच्या पथकांनी गेल्या 15 दिवसात चोरीच्या एकुण 23 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्ह्याचे भौगोलीक स्थान गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सिमेवर असल्याने आंतरराज्य गुन्हेगार हे एका राज्यात चोरी करून दुस:या राज्यात वाहने विकतात. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने तपासाला गती दिली.  मागील 15 दिवसांपासून आपल्या पथकासह अथक परिश्रम घेवून धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यातील डोंगराळ भागातून व शेजारील राज्यातून संशयीत इसमांची माहिती मिळविली. पथकाने मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिनेश चंपक तडवी, रा.गदवानी, ता.अक्कलकुवा यास ताब्यात घेवून त्यांचेकडून एक लाख 50 हजार रुपये किंमतीच्या हिरो होंडा कंपनीच्या तीन व बजाज कंपनीची एक, सुरेश कालुसिंग पावरा, रा.वाडी, ता.शिरपूर यांचेकडून तीन लाख 50 हजार किंमतीच्या हिरोहोंडा कंपनीच्या आठ व बजाज कंपनीची एक, मुश्ताक नुर मोहमंद मक्रानी रा.छोटी राजमोही, ता.अक्कलकुवा यांचेकडून चार लाख 20 हजार किंमतीच्या हिरोहोंडा कंपनीच्या आठ, होंडा कंपनीच्या    दोन अशा एकूण नऊ लाख 20 हजार रुपये किंमतीच्या एकूण 23 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी या मोटारसायकली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, विसरवाडी, धुळे, शिरपूर, अंमळनेर, चोपडा, शिंदखेडा या भागातून तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील सिमावर्ती भागातून चोरल्याचे सांगितले आहे.हे आरोपी आंतरराज्य गुह्यांमध्ये सक्रीय असून, त्यांच्याकडून पुढील तपासात अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे.शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, अनिल गोसावी, रवींद्र लोंढे, हवालदार पंढरीनाथ ढवळे, रवींद्र पाडवी, विकास पाटील, योगेश सोनवणे, विनोद जाधव, दीपक गोरे, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे,   जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, भटू धनगर, गोपाल चौधरी, संदीप    लांडगे, मोहन ढमढेरे, तुषार पाटील, किरण पावरा, राहुल भामरे, महेंद्र सोनवणे, किरण मोरे, अमोल पवार, रामचंद्र ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.या वेळी जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची माहिती दिलेली असून, ज्या नागरिकांच्या मोटारसायकलींची चोरी झाली असेल त्यांनी माहितीची पडताळणी करून आपली मोटारसायकल असल्यास स्थानिक गुन्हे अन्वे.शाखा नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.