शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

दोन तासांच्या बैठकीत 223 विषयांना मंजुरी

By admin | Updated: February 17, 2017 23:12 IST

शहादा पालिका : 17 लाख 83 हजारांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

शहादा : शहरातील विकास कामे करताना त्या प्रभागातील नगरसेवकांना त्याची पूर्वकल्पना देणे. तसेच प्रत्येक सभेपूर्वी टिप्पणी झाल्याशिवाय विषय अजेंडय़ावर घेऊ नये, अशा सूचना नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिल्या. सव्वा दोन तास चाललेल्या या सभेत 2017-18 साठी 17 लाख 83 हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पासह 223 विषयांना मंजुरी देण्यात आली.शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा कै.काशीनाथभाई पाटील सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते. सभेला उपनगराध्यक्षा रेखा भानुदास चौधरी, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते.कार्यालय अधीक्षक गजानन सावळे यांनी अहवाल वाचन केले. सभा सुरू होताच नगरसेवक प्रा.मकरंद पाटील यांनी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विषय अजेंडय़ावरील 16 विषय नामंजूर करण्यात यावेत, चार विषय योग्य ती दुरुस्ती करून पुढील सर्वसाधारण सभेत मांडावेत व 10 विषयांवर मुख्याधिका:यांनी कायदेशीर निर्णय घेऊन कार्यवाही करावी. विषय क्रमांक 22 हा दोनवेळा घेण्यात आलेला होता.विषय अजेंडय़ावरील विषयांचे वाचन करण्यापेक्षा सर्व नगरसेवकांना विषय टिप्पणी दिली आहे. योग्या त्या विषयावर सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे. शहराच्या विकास कामांसाठी मुख्याधिका:यांनी सहा महिन्यार्पयत कार्यालय सोडू नये. पालिका हद्दीतील 200 पेक्षा जास्त आरक्षित जागा आहेत. त्यापैकी काही मालकांनी जागा हस्तांतरित केलेली नाही. त्याचा त्वरित सव्रे करून मगच विकास कामे करावीत, असे प्रा.मकरंद पाटील यांनी सांगितले. पालिकेत निम्मेपेक्षा जास्त महिला नगरसेविका असून उपनगराध्यक्षपदीही महिला आहेत. तसेच पालिकेत तक्रारी व समस्या मांडण्यासाठी येणा:या महिला या सर्वासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी नगरसेवक संजय साठे यांनी केली. युवकांसाठी लाखो रुपये खर्च करून क्रीडा मैदान   उभारले आहे. मात्र ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी नगरसेवक संदीप पाटील यांनी आयत्यावेळी येणा:या विषय चर्चेप्रसंगी केली. विषय क्रमांक चार, पाच, सहा व सात हे विषय अर्थसंकल्पाशी निगडित असल्याने योग्य त्या दुरुस्ती करून हे विषय पुढील सभेत चर्चेत घ्यावेत, असे मत नगरसेवक लक्ष्मण बढे यांनी मांडले. विषय क्रमांक 36 दुकान संकुल व पालिका इमारत बांधकाम हा होता. याबाबत पालिकेने विचार करावा, असे प्रा.पाटील यांनी सांगितले.नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, शहराच्या विकास कामांसाठी सत्ताधारी गटासह विरोधक नगरसेवकांना विश्वासात घेण्यात येईल. त्या त्या विभागाकडे किती निधी पडला आहे त्यानुसार प्रस्ताव ठेवून विषय मंजुरीसाठी ठेवावेत. गेल्या दोन वर्षापासून सफाई कामगार महिला कामावर आली नाही. या महिला कामगाराने आरोग्य स्वास्थ्य ठिक नसल्याचे कारण पुढे केले असून मुख्याधिका:यांनी याबाबत प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कार्यवाही करावी अन्यथा कामावर रूजू करू नये. शहराच्या विकास कामांसाठी स्थानिक आमदार-खासदार व विकास निधी किती उपलब्ध होणार याबाबत आज सांगणे अशक्य आहे. मात्र भविष्यात विकास कामांसाठी निधीचे नियोजन कसे असावे यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी जागृतपणे काम करावे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या कामांना न्याय द्यावा, असे सांगून नगरसेवकांनी विषय देताना नियोजनपूर्वक द्यावेत, असे नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले. या वेळी नगरसेवक आनंदा पाटील, रेखा पाटील, नाना निकुंभे, संजय साठे, विद्या जमदाळे, लक्ष्मण बढे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)शहादा शहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ज्ॉकवेल येथे कार्यक्षम अधिकारी नेमावा, असे नगरसेविका योगिता वाल्हे यांनी सूचित केले. पालिकेने शहराला पाणीपुरवठा करणारी योजना हस्तांतरित करताना सर्व बाबींची पूर्णता करून घेणेही गरजेचे असल्याचे सांगून पालिकेतील रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचा:यांच्या पदांबाबतही पालिकेने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.स्व.पी.के. अण्णांनी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आदर्शाची रुजवणूक केली आहे. पालिकेच्या माध्यमातून शहर विकास घडवून आणणे आपले ध्येय आहे. नगराध्यक्षपदी जरी भाजपाचे असले तरी विकास कामांसाठी आपण त्यांना सहकार्य करू, असे यापूर्वीच घोषित केले आहे. निव्वळ विरोधासाठी विरोध हे सूत्र आपणास मान्य नसल्याने विकासाच्या सर्व मुद्यांना आमच्या नगरसेवकांचा सतत पाठिंबा राहणार आहे.-दीपक पाटील, चेअरमन, सातपुडा साखर कारखानाशहरवासीयांच्या प्राथमिक अपेक्षा व गरजा पाणी, रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेच्या असतात. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती व्हावी यासाठी आमचे सर्व नगरसेवक सत्ताधारी नगराध्यक्षांसह त्यांच्या टीमला सहकार्य करतील. प्राथमिक शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी भविष्यातही सहकार्याची भूमिका राहील.-प्राचार्य मकरंद पाटील, स्वीकृत नगरसेवक, शहादा पालिका