शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात रोज 200 किलो प्लॅस्टीक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:52 IST

आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर : पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाकडून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्या व निवासी हॉटेल्समध्ये विकल्या जाणा:या प्लॅस्टीकच्या पाण्याच्या बाटल्यावर बंदी आणण्याची कार्यवाही करण्यात येत आह़े परंतु नंदुरबार शहरात अद्यापही छोटय़ापासून ते बडे व्यापारी बिनधास्तपणे प्लॅस्टीकच्या पिशव्याचा वापर करीत असल्याची स्थिती आह़ेशासनाकडून घेण्यात येणा:या ‘प्लॅस्टीकमुक्त महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पाश्र्वभूमिवर ‘लोकमत’तर्फे नंदुरबार शहरातील प्लॅस्टीकच्या वापराचे सव्रेक्षण करण्यात आल़े नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दर दिवसाला सुमारे 200 किलो प्लॅस्टीकच्या कच:याची उचल करण्यात येत असत़े कच:याचे संकलन करताना ओला व सुका कचरा असे विभाजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितल़े परंतु असे असूनही प्लॅस्टीक कचरा तयार होणे थांबायचे नाव घेत नाही़ त्यामुळे या परिस्थितीवर वचक बसणार कसा असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना भेडसावत आह़े मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आणली जावी यासाठी वेळावेळी व्यापा:यांची बैठक घेण्यात आली आह़े वारंवार सुचना देऊनही ज्या व्यापा:यांकडून आदेशाचे पालन झाले नाही अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली़ दंडात्मक कारवाई होऊनही जे व्यापारी यास जुमानत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही प्रक्रीया करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येत असली तरी, नागरिकांनीही याबाबत लक्ष देऊन प्लॅस्टीक पिशव्यांची मागणी न करता इको फ्रेंडली पध्दतीने कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आह़े