शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

आरोग्यसेवेला लागणार ‘200 खाटांचा आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2017 अखेरीस जिल्ह्यात तब्बल सहा लाख रुग्णांनी शासनाच्या वैद्यकीय सेवेचा घेतला़ आंतर आणि बाह्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 2017 अखेरीस जिल्ह्यात तब्बल सहा लाख रुग्णांनी शासनाच्या वैद्यकीय सेवेचा घेतला़ आंतर आणि बाह्य रुग्ण कक्षांमध्ये तपासणी आणि उपचार घेणा:या या रुग्णांची आरोग्य सेवेबाबत जागरुकता असली तरी खाटांअभावी या रुग्णांना सेवा देण्यात आरोग्य विभागाला अडथळे आले होत़े यामुळे आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात सुरु असलेले रुग्णालय, दवाखाने, प्रसूतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे 200 खाटांची भर पडल्यास रूग्णसेवा सुलभ होणार आह़े जिल्ह्यातील नागरिकांना  13 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 सामान्य रुग्णालय, 25 दवाखाने, 14 प्रसूतीगृहे, 58 प्राथमिक आरोग्य आणि 290 उपकेंद्र अशा 403 ठिकाणाहून वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत़ यासाठी 1 हजार 380 खाटांना आरोग्य विभागाने मंजूरी दिली आह़े यातून आंतररुग्ण म्हणून दाखल होणा:या रुग्णांना दीर्घकालीन सेवा मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत आह़े परंतू दर वर्षी रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने 1 हजार 300 खाटा अपु:या पडत असल्याने शासनाने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, 100 खाटांचे महिला रुग्णालय आणि आयुष रुग्णालय निर्मितीची घोषणा केली होती़ परंतू सरत्या वर्षात या घोषणांच्या पुढे कामकाज झालेले नसल्याने तूर्तास 200 खाटांची तरतूद व्हावी असा पाठपुरावा आरोग्य विभागाने शासनाकडे सुरु केला आह़े या पाठपुराव्याला प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्यात आंतररुग्णांची वाढती संख्या असल्याचे सांगण्यात येत आह़े वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेता शासनाने 500 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर ब:यापैकी समस्या सुटण्याची अपेक्षा होती़ परंतू त्याचे काम अद्यापही सुरु झालेले नसल्याने रुग्णसेवेचा प्रश्न अधांतरी आह़ेएकीकडे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिक्षा असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील 100 खाटांचे महिला रुग्णालय, जमाना येथील 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय, धडगाव येथील 60 खाटांचे महिला रुग्णाजय यांची कामे अपूर्ण असल्याने रुग्णसेवेवरचा ताण कमी होत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े ही कामे पूर्ण झाल्यावरही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरु होण्यास 2020 उजाडणार असल्याची माहिती आह़े वैद्यकीय सुविधांमध्ये आयुष रुग्णालयाचा एक चांगला उपक्रम जिल्ह्यात यंदा सुरु होणार होता़ यासाठी जिल्हा रुग्णालयात जागा मंजूर करुनही केवळ इमारतीअभावी 30 खाटांचे हे रुग्णालय रखडले आह़े जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार 16 लाख लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून 2016-17 या वर्षात 1 लाख 84 हजार 381 रुग्णांनी त्या-त्या रुग्णालय, दवाखाने, प्रसूतीगृहे आणि आरोग्य केंद्राच्या आंतररुग्ण कक्षातून उपचार घेतले होत़े यात 38 हजार 588 पुरुष, 91 हजार 832 स्त्रिया आणि 53 हजार 970 मुलांचा समावेश आह़े दाखल झालेल्या या आंतररुग्णांनी  किमान दोनपेक्षा अधिक दिवस उपचार घेतल्याने इतर रुग्णांना खाटा अपु:या पडल्या होत्या़ याच दरम्यान तब्बल 4 लाख 37 हजार 673 नागरिकांनी बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतल्याची माहिती आह़ेयात 1 लाख 64 हजार 173 पुरुष, 2 लाख 27 हजार 410 स्त्रिया आणि 46 हजार 90 बालकांचा समावेश आह़े यातील काहींनी पुढे आंतररुग्ण कक्षांत दाखल होऊन उपचार घेतले होत़े रुग्ण म्हणून दाखल होणा:या महिलांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यासाठी 749 खाटांची निर्मिती करण्यात आली आह़े तर लहान मुलांसाठी 191 खाटा जिल्ह्यात आहेत़ उर्वरित खाटा ह्या पुरुषांसाठी देण्यात येतात़ जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व 403 रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये केवळ 208 डॉक्टर सेवा देत आहेत़ त्यांच्या साथीला 480 परिचारिका आहेत़ यातही प्रसूतीगृहांसाठी स्त्रीरोग तज्ञांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आह़े जिल्ह्यात शासनाकडून केवळ 14 प्रसूतीगृहे चालवली जातात़ यात 3 अक्कलकुवा, 1 धडगाव, तळोदा 1, शहादा 2, नंदुरबार 4, तर नवापूर तालुक्यात 3 ठिकाणी प्रसूतीगृहे आह़े त्यातुलनेत 33 ठिकाणी खाजगी डॉक्टरांकडून खाजगी प्रसूतीगृहे जिल्ह्यात चालवली जातात़