लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 19 हजार 340 शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित आहेत़ आजअखेरीस अर्ज करणा:या 47 हजार 590 पैकी 28 हजार 250 शेतकरी कजर्मुक्त झाले असून या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च असल्याची माहिती असल्याने उर्वरित शेतकरी कजर्मुक्त कधी होणार असा, प्रश्न उपस्थित होतो आह़े जिल्ह्यातील 9 राष्ट्रीयकृत बँका, 1 खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 27 हजार 194 खातेदार शेतक:यांचा शासनाने पहिल्या टप्प्यातील ‘ग्रीन’ यादीत समावेश केला होता़ यासाठी 107 कोटी 11 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होत़े डिसेंबर 2018 र्पयत यातील केवळ 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले होत़े तर 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2019 र्पयत केवळ 4 हजार 335 शेतक:यांच्या कजर्माफीची प्रक्रिया पूर्ण झाली आह़े यापुढे आता ‘यलो’ लिस्टमधील शेतक:यांच्या कजर्माफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आह़े परंतू यासाठी मार्च अखेरीर्पयतचीच मुदत असल्याने संपूर्ण कजर्माफी होणार कशी यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आह़े शिल्लक असलेल्या 19 हजार 340 शेतक:यांचा यलो लिस्टमध्ये समावेश होता़ कजर्माफीस पात्र असल्याने त्यांना ग्रीनलिस्टमध्ये आणून कजर्माफी दिली जाईल असे सांगण्यात आले होत़े ही प्रक्रिया गेल्या तीन महिन्यात संथगतीने सुरु असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ शासनाकडून यलो लिस्टमधील शेतक:यांच्या नावांच्या दुरुस्त्या, बँक खाते क्रमांक, आधार आणि पॅन क्रमांक टाकणे यासह विविध दुरुस्त्या करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होत़े ज्यांच्या नावात आणि इतर कागदपत्रांमध्ये दुरुस्त्या झाल्या आहेत़ त्यांना ग्रीन लिस्टमध्ये समावेश करण्यात येणार होत़े परंतू गेल्या सहा महिन्यापासून हे बँका या कामकाजाला गांभिर्याने घेत नसल्याने शेतकरी कजर्माफीपासून वंचित आहेत़ येत्या दोन महिन्यानंतर शेतकरी बँकांमध्ये शेतकरी पिककर्जासाठी रांगा लावणार आहेत़ हे कर्ज मागताना मागील कर्जाची पडताळणी करुन पुढील कर्ज देण्याचा बँकांचा अट्टाहास राहणार आहेत़ यातून कजर्माफी न झाल्यास 19 हजार शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत़गेल्या तीन महिन्यात बँक ऑफ बडोदाने 44 शेतक:यांना 29 लाख 72 हजार, बॅक ऑफ इंडियाने 369 शेतक:यांना 2 कोटी 3 लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने 974 शेतक:यांना 9 कोटी 65 लाख 65 हजार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 1 हजार 17 शेतक:यांना 4 कोटी 30 लाख, ग्रामीण बँकेने 2 शेतक:यांना 1 लाख 67 हजार, स्टेट बँकेने 358 शेतक:यांना 2 कोटी 73 तर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर शेडय़ूल्ड बँकांनी 1 हजार 809 शेतक:यांना 7 कोटी 94 लाख रुपयांची कजर्माफी दिली आह़े यांतर्गत एकूण 4 हजार 573 शेतक:यांना 26 कोटी 99 लाख 11 हजार रुपयांची कजर्माफी डिसेंबरनंतर करण्यात आली आह़े अद्यापही बँकांना नवीन ग्रीन लिस्ट प्राप्त झाली आह़े या यादीनुसार येत्या आठवडय़ात कजर्माफीच्या कार्यवाही सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आह़े गेल्या दोन आठवडय़ापासून बँकांकडून दुष्काळमदतनिधीसाठी पात्र शेतक:यांच्या याद्या तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी शेतक:यांच्या खात्यांची माहिती घेतली जात आह़े यातून कामकाज वाढले आह़े या दोन योजनांच्या अंमलबजावणीत 2017 पासून सुरु असलेले कजर्माफी योजना रेंगाळण्याची दाट चिन्हे आहेत़ परंतू दोन्ही योजनांपेक्षा कजर्माफी योजना शेतक:यांसाठी पुढील खरीप हंगामाचे नियोजन म्हणून महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बँकांना पाठपुरावा करण्यात येत असूनबैठका घेत त्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
19 हजार शेतक:यांना हवा कजर्माफीचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:58 IST