लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : अवैधरित्या विनापरवाना कत्तलीसाठी बैलांना घेऊन जाणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून १७ बैल व दोन वळूंसह पाच लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात दोन चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. ही घटना शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिखोरा पुलाजवळ घडली.मिळालेल्या माहितीनुसार, २७ जुलैच्या मध्यरात्री शहादा ते तिखोरा रस्त्यावरील गोमाई नदीवरील पुलाजवळ दोन पिकअप व्हॅन संशयितरित्या पोलिसांना मिळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात १४ बैलांना क्रूरपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी विनापरवाना घेऊन जात असताना मिळून आले. यासंदर्भात शहादा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई दिनकर चव्हाण व भरत बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित भिमसिंग पटले (चालक, रा.मांडवी खुर्द, ता.धडगाव), दिनेश माल्या पटले (रा.खांबाला, ता.धडगाव), जयसिंग पाडवी (रा.मांडवी, ता.धडगाव), सागसिंग दाज्या वळवी (रा.सेलगदा, ता.धडगाव), नसीर रहासे (रा.मांडवी, ता.धडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसºया एका घटनेत फत्तेपूर गावाच्या नदीकाठी मध्यरात्रीच्या सुमारास तीन बैल व दोन वळू कुठलाही परवाना नसताना कत्तलीसाठी खरेदी करून ते विक्री करण्यासाठी जवळ बाळगून घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आले. यासंदर्भात शहादा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई हरीश बजरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिरोज खान कुरेशी (रा.फत्तेपूर, ता.शहादा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याजवळून ६८ हजार रुपये किमतीचे तीन बैल व दोन वळू जप्त करण्यात आले. पुढील तपास हवालदार पावरा करीत आहेत. संशयितांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्यात दोन्ही पिकअप व्हॅनचा क्रमांक उपलब्ध झालेला नाही.
कत्तलीसाठी जाणारे १९ गोवंश जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:13 IST