शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लघुप्रकल्पांमध्ये १९ तर मध्यमप्रकल्पांत ३३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:08 IST

दुष्काळझळा : जिल्ह्यातील ३७ प्रकल्पांची स्थिती दयनीय

नंदुरबार : जिल्ह्यात दुष्काळझळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत़ यातच पाणीसाठ्यातही घट होत असून विविध भागातील ३७ लघुप्रकल्पात १९ तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ तुरळक अशा या साठ्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याचे दिसून आले आहे़नवापूर तालुक्यात ११, नंदुरबार ११, शहादा ७, अक्कलकुवा आणि धडगाव प्रत्येकी १ तर तळोदा तालुक्यात पाच असे ३७ लघुप्रकल्प आहेत़ एकूण ९५़०३ दशलक्ष घनमीटर साठ्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पांमध्ये आजअखेरीस केवळ ८८़५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे़ यातील ६़५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हा मृत असल्याने केवळ ८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वापरायोग्य आहे़ एकत्रितपणे जलसाठा संख्येच्यादृष्टीने मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी पाणी आटल्याचे दिसून आले आहे़ नवापूर तालुक्यातील सर्व ११ लघुप्रकल्पच यंदा पूर्ण क्षमतेने भरले असल्याची स्थिती आहे़ उर्वरित पाच तालुक्यातील २६ प्रकल्पांमध्ये १ ते दीड दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच शिल्लक आहे़लघुप्रकल्पांची स्थिती कमकुवत होत असताना मध्यप्रकल्पांची स्थिती गंभीर आहे़ रंगावली प्रकल्पात ३२, प्रकाशा बॅरेज ४०, सारंगखेडा बॅरेज ३६, शिवण २३ तर शहादा तालुक्यातील दरा मध्यमप्रकल्पात ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ एकूण १० हजार २२२ दशलक्ष घनफूट असलेले हे पाणी कालवे आणि उपसा सिंचन योजनेअभावी निरुपयोगी ठरत आहेत़ शिल्लक असलेला साठा मे महिन्यातही पुरेसा ठरणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे़ लघु आणि मध्यम प्रकल्पाच्या बळावर पाणीयोजना आणि शेतीचे सिंचन होत असल्याने पाण्याअभावी त्यांची स्थिती बिकट होणार आहे़