शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शहादा उपविभागात 189 मंडळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा शहर व ग्रामीणसह धडगाव परिसरात गणपती बाप्पा मोरया च्या जयजयकार करत गणेश मंडळांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा शहर व ग्रामीणसह धडगाव परिसरात गणपती बाप्पा मोरया च्या जयजयकार करत गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची विधिवत स्थापना केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळ व एक गाव एक गणपती मिळून सुमारे 189 गणेश मंडळाची ऑनलाइन नोंद झाली असल्याची माहिती शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली.गणेश चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची उत्साहपूर्णवातावरणात स्थापना केली. गेल्या महिनाभरापासून कार्यकर्ते उत्साहाने ‘श्रीं’च्या आगमनाची वाट पाहत होते. स्टेज, आरास व विद्युतरोषणाईच्या कामात पदाधिकारी मग्न होते. एक दो तीन चार गणपतीचा जयजयकारच्या गजरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. शहादा शहरात चार टप्प्यात ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणुकीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. शहरात एकूण 45 सार्वजनिक तर तीन खाजगी गणेश मंडळ व ग्रामीण भागातील 20 गणेश मंडळांची नोंद झालेली आहे. पहिल्या टप्प्यातील पाचव्या दिवशी शहरात आठ, ग्रामीण भागात नऊ तर दुस:या टप्प्यात सातव्या दिवशी शहरातील बारा, ग्रामीण भागात पाच मंडळांतर्फे विसजर्न मिरवणूक काढण्यात येणार आहे. तिस:या टप्प्यात नवव्या दिवशी शहरातील 12, ग्रामीण भागात दोन व अनंत चतुर्थीच्या दिवशी शहरातील तेरा सार्वजनिक गणेश मंडळ तर ग्रामीण भागातून चार सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात. शहादा येथे एकूण 54 गणेश मंडळ आहेत. ग्रामीण भागात सार्वजनिक 23 व एक गाव एक गणपतींतर्गत तीन असे एकूण 80 मंडळांनी नोंद केलेली आहे. धडगाव येथे शहरीभागात आठ तर ग्रामीण भागात सार्वजनिक सहा व एक गाव एक गणपतींतर्गत 20 मंडळाची नोंद करण्यात आली आहे. सारंखेडा पोलीस ठाण्यांतर्गत गावात सार्वजनिक गणेश मंडळ ग्रामीण भागात 20, एक गाव एक गणपतींतर्गत चार असे एकूण 32 गणेश मंडळ आहेत. म्हसावद पोलीस ठाण्यांतर्गत गावात दहा मंडळ तर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक 23, एक गाव एक गणपती 14 असे एकूण 57 मंडळाची नोंद आहे. शहादा, धडगाव, सारंखेडा, व म्हसावद शहरी भागात 80 मंडळ ग्रामीण भागात 109 मंडळ तर एकूण 189 मंडळाची नोंद असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी सांगितले. शहाद्यातील चार टप्प्याच्या श्री विसर्जन मिरवणुकी करिता धुळे येथून विशेष पोलीस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे. शहादा शहर हे शांततामय शहर आहे. श्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या कार्यकत्र्यानी शांततेत व उत्साहात उत्सव साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहराची शांतता कायम राहावी याकरिता एसआरपीएफ प्लाटून , पोलीस उपनिरीक्षक अधिकारी तील, होमगार्ड 112 व 53 पोलीस कर्मचा:यांना शहरात बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. शहादा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी म्हटले की, गणेश उत्सव व मोहरम हा हिंदू-मुस्लिम बांधवांचा सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात यावा सन साजरा करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याचे भान प्रत्येकाने ठेवावे. सण-उत्सवा दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता शहरातील प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्ग व शांतता भंग होऊ शकतो अशा काही भागात एकूण 48 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. कॅमे:यातील प्रत्येक चित्रफित थेट जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक शहर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या संपर्कात असून, अति उत्साही कार्यकत्र्यानी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. या सोबत श्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान, शहरात एकूण चार ड्रोनच्या माध्यमातून मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. शहरात आरस व श्री गणेश दर्शनाकरिता तिस:या दिवसापासून शहर व ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवक-युवती यांची गर्दी   होणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी, महिला पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.