शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 180 बालकांचा एचआयव्हीपासून बचाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:31 IST

दहा वर्षाची स्थिती: जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाचे प्रयत्न

कोठार :  मागील दहा वर्षात जिल्ह्यातील 180 बालकांना एचआयव्ही, एड्सपासून वाचविण्यात जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाला यश आले आहे.एचआयव्ही एड्सग्रस्त गरोदर मातांकडून त्यांच्या होणा:या बाळाला एचआयव्ही, एड्सचे संक्रमण होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणात असते. परंतु गरोदरपणात योग्य औषधोपचार मिळाला तर गरोदर मातांकडून एचआईव्ही, एड्सच्या संक्रमणपासून जन्माला येणा:या बालकांचा बचाव करता येतो. नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाला मागील दहा वर्षात जिल्ह्यातील 180 बालकांना एचआयव्ही, एड्सबाधित गरोदर मातांकडून होणारे एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यात यश आले आहे. एचआयव्ही बाधित गरोदर मातेकडून होणा:या एड्स प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातांना तिस:या महिन्यापासून ए.आर.टी औषधोपचार सुरू करण्यात येतो. या मातांची प्रसूतीदेखील सरकारी दवाखान्यातच करण्यात येते. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या नवजात बालकाला ‘नेव्ही रॅपिन’ नावाचे औषध देण्यात येते. त्यानंतर त्या बालकांची सहा आठवडे, सहा महिने, बारा महिने, अठरा महिने अश्या टप्प्यात त्याची नियमित तपासणी करण्यात येते. अशा मातांना केवळ सहा महिने बाळाला अंगावरचे दूध पाजायचे असते. हा सर्व औषध उपचार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय इत्यादींमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येतो. आतापयर्ंत जिल्ह्यातील सुमारे 225 एचआयव्ही, एड्स बाधित गरोदर मातांना जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या वतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत नंदूरबार जिल्हा रुग्णालयात जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग कार्यरत आहे. 2008 साली जिल्हा रुग्णालयात हा विभाग सुरू करण्यात आला. रुग्णांची एचआयव्ही, एड्सची तपासणी करणे, त्यांना मोफत औषधोपचारची सेवा पुरविणे व त्यांचे समुपदेशन करणे,जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांची माहिती संकलित करणे व ती अद्ययावत ठेवणे, जिल्ह्यातील आरोग्य केंद्राना एचआयव्ही, एड्स तपासणी किट व औषधी उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील ‘दिशा’ केंद्राशी समन्वय ठेवून त्यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणे, एचआयव्ही  आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांना माहिती देणे व जनजागृती करणे अश्या विविध स्वरूपाची कामे या विभागामार्फत केली जातात.