शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 53 ग्रामपंचायतींसाठी 170 मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:04 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 170 मतदान केंद्रांची निर्मिती प्रशासनाने केली आह़े जिल्ह्यात  66 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आह़े यासाठी महसूल विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून निवडणूक अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायतींकडे रवाना होणार आहेत़ शहादा तालुक्यातील 22, नवापूर ...

नंदुरबार : जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 170 मतदान केंद्रांची निर्मिती प्रशासनाने केली आह़े जिल्ह्यात  66 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आह़े यासाठी महसूल विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून निवडणूक अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायतींकडे रवाना होणार आहेत़ शहादा तालुक्यातील 22, नवापूर 5, तळोदा 4, अक्कलकुवा 2 तर नंदुरबार तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींसाठी होणा:या या मतदानात लोकनियुक्त सरपंच पदासाठी 174 तर सदस्य पदासाठी 756 उमेदवार रिंगणात आहेत़ शहादा आणि नंदुरबार तालुक्यात निवडणूक सर्वाधिक लक्ष्यवेधी असून दोन्ही तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजेनंतर थंडावला़ प्रचारात स्थानिक मुद्दे चर्चिले गेल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आह़े नंदुरबार तालुक्यात 23 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ यात सुजालपूर, नाशिंदे व भागसरी ही गावे बिनविरोध झाली होती़ उर्वरित 20 ग्रामपंचायतीतील 54 प्रभागात 54 उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने तालुक्यात आता 19 सरपंच पदाच्या जागांसाठी 59 तर सदस्य पदाच्या 178 जागांसाठी 307 उमेदवार रिंगणात आहेत़ 20 ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून 60 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आह़े यासाठी 414 कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े या कर्मचा:यांकडून 80 मतदान यंत्रे देण्यात आली असून बुधवारी सकाळी तहसील कार्यालयात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत़ सोमवारी तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान यंत्रे सील करण्यात आली होती़ शहादा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी 72 तर सदस्य पदासाठी 258 उमेदवार रिंगणात आहेत़ तालुक्यातील 10 ग्रामपंचायती या पूर्वी बिनविरोध झाल्या आहेत़ तर सदस्य पदाच्या 266 जागांपैकी 131 जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या़ यातही 22 ठिकाणी उमेदवारांचे अजर्च न आल्याने त्या ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आल्या आता 23 सरपंच आणि 123 सदस्य पदासाठी मतदान होणार आह़े बुधवारी होणा:या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर शहादा तहसील कार्यालयाने 71 मतदान केंद्रांची निर्मिती केली आह़े यात 100 बूथ ऑफिसर तर 400 मतदान कर्मचारी यांची नियुक्ती आह़े तसेच 100 कर्मचारी हे राखीव म्हणून तैनात राहणार आहेत़ या कर्मचा:यांचे प्रशिक्षण तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ़उल्हास देवरे यांनी घेतले होत़ेतालुक्यातील आडगाव, करजई, पिंप्री, लांबोळा, वाघोदा, उजळोद, तितरी, सावळदे, वाघर्डे आणि नवानगर ह्या ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत़