शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

168 हातपंप नादुरूस्त असल्याने टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील दुष्काळी दौ:यात विविध गावांमधील 168 हातपंप नादुरूस्त असून, त्यांची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील दुष्काळी दौ:यात विविध गावांमधील 168 हातपंप नादुरूस्त असून, त्यांची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील गावक:यांना कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती नसली तरी संबंधीत प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आमदार उदेसिंग पाडवी यांनी 10 ते 12 दिवस आपल्या कार्यकत्र्यासमवेत तळोदा तालुक्यातील ग्रामीण खेडय़ांना भेटी दिल्यात. त्या वेळी त्यांनी गावातील पाणीटंचाई व शासनाच्या इतर योजनांबाबतीत गावक:यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांना शासनाच्या योजना व पाणीटंचाईचे विदारक चित्र दिसून आले होते. अनेक गावामधील जवळपास 168 हातपंप नादुरूस्त झालेले आहेत. अद्यापर्पयत गावात संबंधीत यंत्रणेकडून दुरूस्तीच करण्यात आली नाही. याशिवाय काही ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्यामुळे बंद पडली आहेत. केवळ यंत्रणांच्या अकार्यक्षम आणि बेजबाबदारीमुळे तेथील नागरिकांना नैसर्गिक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावक:यांनी दुरूस्तीबाबत संबंधीतांकडे मागणी करूनही त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आली आहे. वास्तविक दुष्काळाच्या पाश्र्वभूमिवर संभाव्य पाणी टंचाईबाबत उपाययोजनांसाठी सजग राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या होत्या. यावर कार्यवाही तर सोडा आपल्या संपूर्ण दौ:यात एकही तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी स्थानिक ठिकाणी  आढळून आले नाहीत. अनेक ग्रामसेवकांच्या बाबतीत नागरिकांनी मोठय़ा तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी अनेक गावांमधील रहिवाशांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नसल्याची तक्रारदेखील नागरिकांनी केली आहे. त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, डॉ.रामराव आघाडे, नितीन पाडवी, नगरसेवक हेमलाल मगरे, भास्कर मराठे, पंचायत समिती            सदस्य यशवंत ठाकरे, कांतीलाल पाडवी, गोपी पावरा, शामसिंग  वळवी, अमरसिंग नाईक, कृष्णा वळवी, माधव पाडवी, भिमसिंग  ठाकरे, स्वरूपसिंग ठाकरे, जयवंत ठाकरे, प्रताप पाडवी, मानसिंग डुमकूळ, महेंद्र पवार, महेंद्र गाडे, सुरेंद्र पाडवी, रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.