शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

16 अव्वल कारकूनांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:38 IST

नंदुरबार : जिल्ह्यात मंजूर असलेल्या नायब तहसीलदारांच्या पदसंख्येत चालू वर्षात वाढ होणार असून नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात अव्वल कारकून ...

नंदुरबार : जिल्ह्यात मंजूर असलेल्या नायब तहसीलदारांच्या पदसंख्येत चालू वर्षात वाढ होणार असून नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात अव्वल कारकून म्हणून काम करणा:या 16 जणांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नत केले आह़े महसूल विभागाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असलेल्या अव्वल कारकूनांच्या समस्या निकाली निघाल्या आहेत़ नंदुरबार जिल्हा प्रशासनात सामान्य शाखा, अभिलेख शाखा, निवडणूक विभाग, सरदार सरोवर प्रकल्प विभाग, नंदुरबार, शहादा आणित तळोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल शाखा तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आह़े एकूण 38 ठिकाणी नायब तहसीलदार पदाची निर्मिती करण्यात आली आह़े यातील सात पदे सध्या रिक्त आहेत़ या उपविभागीय, महसूल आणि तालुका पातळीवर विविध कामकाजात प्रांताधिकारी आणि अधिका:यांना सहाय्य करणा:या या नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या सात ते आठ वर्षापासून प्रलंबित होता़ महसूल विभागीय परीक्षा पास होऊनही अनेकांना संधी मिळालेली नव्हती़ यातून नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने 16 अव्वल कारकूनांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती़ यावर विभागीय आयुक्तांनी आदेश काढून 16 जणांना पदोन्नत करण्याचा निर्णय घेतला आह़े यातील 15 नंदुरबार जिल्ह्यात तर एक अव्वल कारकून धुळे जिल्ह्यात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होणार आहेत़ आगामी निवडणूक काळासाठी या अधिका:यांचा उपयोग होणार असल्याने जिल्हा प्रशासनातून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े एकीकडे 16 जणांना पदोन्नत करण्याचा शासनाने निर्णय घेतला असताना दुसरीकडे नायब तहसीलदार पदावर कार्यरत एका अधिका:यास पदवनत करण्यात आले आह़े त्यांची पुन्हा अव्वल कारकून म्हणून नियुक्ती झाली आह़े विभागीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेला धरुन पदोन्नती झालेली नसल्याने विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिला आह़े