शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:37 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील १६ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला असून आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाणी ...

नंदुरबार : जिल्ह्यातील १६ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला असून आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाणी साठा केवळ ४० टक्के इतका आहे. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्वच लघु प्रकल्प कोरडे होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा ६७ टक्के पाऊस झाला होता. झालेला पाऊस देखील अनियमित होता. त्यामुळे खरीपाचे नुकसान तर झाले. परंतु लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये देखील अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यात ३७ लघु व चार मध्यम प्रकल्प आणि दोन बॅरेजेस आहेत. त्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत केवळ ६० टक्के पाणीसाठा झाला होता. एकही लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला नव्हता. केवळ रंगावली मध्यम प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला होता. आता सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून काही प्रकल्प कोरडे पडले आहेत.१६ प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील शहादा, नंदुरबार तालुक्यातील १६ प्रकल्प कोरडे झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. तर आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केच्या आत पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पांमध्ये ४० ते ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांपैकी रंगावली मध्यम प्रकल्पात सरासरी ६० टक्के पाणीसाठा आहे. राणीपूर प्रकल्पात ५५ टक्के, दरा प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांमधील खालावलेली पाणी पातळीमुळे अनेक प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी देखील यंदा अपेक्षीत आवर्तन सोडले गेले नसल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके वाया गेली तर काही भागात कमी उत्पादन मिळाले.पाणी पातळी खालावलीजिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू शकले नाही. शिवाय प्रकल्पांमध्येही अपेक्षीत पाणी साठा न झाल्याने भुगर्भातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. यंदा सरासरी एक ते दीड मिटरने पाणी पातळी खालावल्याचा अहवाल भुजल सर्व्हेक्षण विभागाने याआधीच दिला आहे. त्यामुळे पिकांना तर नाहीच आता पिण्यासाठी देखील पाणी नसल्याची स्थिती आहे.