शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

नंदुरबार तालुक्यात औद्योगिकरणाच्या नावावर 16 कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:47 IST

जमीन खरेदी प्रकरण : शासनाकडून रक्कम वसुलीबाबत नोटीसा

रमाकांत पाटील । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : औद्योगिक विकासाच्या नावावर स्वस्त दरात व शासनाचा कर बुडवून मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. नंदुरबार तालुक्यात अशा प्रकारे सुमारे 321 हेक्टरपेक्षा जास्त जमीन खरेदी करण्यात आली असून त्यातून शासनाचा 16 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात शासनातर्फे संबधितांना नोटीसा बजावून वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.औद्योगिक विकास व्हावा यासाठी शासनाने 1994 मध्ये नवीन धोरण जाहिर केले होते. त्या आधारावर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी करण्यात आल्या. मात्र, शासनाचा उद्देश त्यातून साध्य झाला नाही. कारण ज्या प्रयोजनासाठी जमीन खरेदी केली होती त्यानुसार किमान पाच वर्षात तेथे उद्योग सुरू करणे आवश्यक होते. परंतु तसे उद्योग सुरू झाले नाही. दरम्यानच्या काळात या संदर्भात शासनाने 2005 मध्ये नवीन धोरण जाहीर केले. त्यानुसार किमान 15 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. परंतु ज्यांनी उद्योगाच्या नावावर केवळ दोन टक्के आकारणी भरून जमीन खरेदी केल्या असतील त्यांच्याकडून 48 टक्के आकारणी  व दंडाची रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे.याच पाश्र्वभुमिवर राज्यात अनेक ठिकाणी उद्योगाच्या नावावर केवळ जमिनीच खरेदी झाल्या पण उद्योग सुरू झाले नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यानुसार महसूल विभागाने या संदर्भात चौकशी मोहिम राबविली. या चौकशीत नंदुरबार जिल्ह्यातही मोठय़ा प्रमाणावर अशा जमिनी खरेदी करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार तालुक्यात अशा प्रकारे 151 जणांनी 321 हेक्टर जमीन खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. या जमिनी औद्योगिकरणाच्या नावावर खरेदी झाल्या आहेत. विशेषत: पोल्ट्रीफॉर्म, गोटफॉर्म, डेअरीफॉर्म, वीटभट्टी असे विविध उद्योग दाखवून त्याची खरेदी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र तेथे कुठलाही उद्योग नाही. त्यामुळे शासनाने संबधितांना नियमानुसार जमिनीची अकारणी व तीनपट दंडानुसार जवळपास 16 कोटी रुपये वसुल करण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. संबधितांनी रक्कम भरल्यानंतरही त्या ठिकाणी ज्या उद्देशाने जमीनी खरेदी झाल्या त्या उद्देशाप्रमाणे तेथे संबधित उद्योग सुरू करणे बंधनकारक आहे. असे न झाल्यास त्या जमिनी सरकारजमा करण्याबाबतही शासनाचा निर्णय आहे.त्यामुळे एकुणच ज्यांनी उद्योगाच्या नावाने जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांचे धाबे दणाणले आहे. काहींनी नोटीसी प्रमाणे रक्कम भरली आहे.