लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अपंग दिव्यांग मतदारांना मतदानासाठी स्थळार्पयत पोहोचण्यासाठी शहादा पंचायत समितीने 150 व्हीलचेअर खरेदी केल्या असून तहसीलदार मनोज खैरनार यांच्या हस्ते व्हीलचेअरचे वाटप ग्रामपंचायतींना करण्यात आले.भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी अपंग दिव्यांग मतदारांना मतदानस्थळार्पयत पोहोचण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला व्हीलचेअर अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांनी सुमारे 150 व्हीलचेअर खरेदी केल्या आहेत. तहसीलदार मनोज खैरनार यांच्या हस्ते ग्रामसेवकांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या वेळी गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, सहायक गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, विस्तार अधिकारी भरत निकुंभे, दिगंबर बेलदार, ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे, राजेश ब्राrाणे, काळू भामरे, राजेंद्र माळी, ग्रामसेवक राजेंद्र बडगुजर, महेश पाटील, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते. प्रत्येक गावातील अपंग दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी प्रोत्साहीत करून मतदान स्थळार्पयत पोहोचण्यासाठी व्हीलचेअरचा उपयोग करण्यात यावा. एकही अपंग दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी ग्रामस्तरावर घेण्यात यावी, असे तहसीलदार खैरनार यांनी या वेळी सांगितले.
शहादा पंचायत समितीतर्फे 150 व्हिलचेअरची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 13:56 IST