शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय लोक अदालतीत दीड कोटीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधी व सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ७१० प्रकरणांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधी व सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ७१० प्रकरणांचा निवाडा करत दीड कोटी रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली़ या उपक्रमात दुरावलेल्या एका जोडप्याचे मनोमिलनही न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात आले़शनिवारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या या उपक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद एस़तरारे, विधी व सेवा प्रधिकरणचे सचिव एस़टी़मलिये, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए़एस़भागवत, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एल़डीग़ायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही़जी़चव्हाण, सहायक दिवाणी न्यायाधीश एस़ए़विराणी यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिले़ त्यांना अ‍ॅड़ ए़बी़सोनार, अ‍ॅड़विनया मोडक, अ‍ॅड़ ए़आऱराजपूत, अ‍ॅड़एऩआऱगिरासे, अ‍ॅड़ के़एच़सावळे, अ‍ॅड़ उमा चौधरी, अ‍ॅड़ मसुदा शेख यांच्यासह विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एऩडी़ चौधरी यांनी मदत केली़ न्यायालयात दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात, धनादेश अनादर, कौटूंबिक वाद, फौजदारी, बँक वसुली, वीज थकबाकी वसुली आणि पाणी पट्टी घरपट्टी वसुलीची विविध प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ यातील ७१० प्रकरणे निकाली काढण्यात पॅनल प्रमुखांना यश आले़दरम्यान गिरीष सुरेश सोनवणे आणि विद्या गिरीष सोनवणे या दाम्पत्याच्या अर्जालाही यावेळी निकाली काढण्यात आले़ दोघांमध्ये वैवाहिक संबध पुर्नस्थापित करुन समेट घडवण्यात आला़ दोघांकडून अ‍ॅड़ सावळे व अ‍ॅड़ एस़आऱचौधरी या दोघांनी काम पाहिले़दिवाणी आणि फौजदारीसह एकूण १२५ प्रलंबित प्रकरणातून ९५ लाख ९९ हजार तर विविध आस्थापनांच्या वसुलीचे ५८५ दाखलपूर्व प्रकरणे याठिकाणी दाखल करण्यात आले होते़ यातून ६१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ एकूण १ कोटी ५७ लाख रुपयांची वसुली न्यायनिवाड्याने करण्यात आले़ दावेदार आणि तक्रारदार यांचे सपूर्ण म्हणणे ऐकून घेत पॅनकडून निवाडा करण्यात आला़ बऱ्याच जणांची प्रकरणे ही १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असल्याने त्यावर तोडगा काढणे शक्य होत नव्हते़ परंतू लोकअदालतीच्या माध्यमातून त्यावर कारवाई करण्यात आली़

लोकअदालतीत प्रलंबित असलेली ४७ दिवाणी प्रकरणे सादर झाली ही सर्व निकाली काढत त्यातून ६ लाख ३ हजार ९५५ रुपयांची वसुली झाली़ २३ मोटार अपघात प्रकरणातून ७४ लाख ९६ हजार, धनादेश अनादराच्या ३९ प्रकरणातून १४ लाख ९९ हजार ४४९ अशा एकूण ९५ लाख ९९ हजार ४०४ रुपयांची वसुली करण्यात आली़ यासोबत प्रत्येकी ८ कौटूंबिक आणि फौजदारी प्रकरणेही निकाली काढण्यात पॅनलला यश आले़या लोक अदालतीत एकूण ५८५ दाखलपूर्व प्रकरणेही निकाली काढण्यात आली़ यातून ६१ लाख ८१ हजार ९१४ रुपयांची वसुली करण्यात आली़ यात बँक वसुलीची ६१ प्रकरणे निकाली निघाली़ त्यातून ५७ लाख ६७ हजार ७५६ रुपये वसुल झाले़ वीज थकबाकीदारांची तब्बल १८ प्रकरणे याठिकाणी ठेवण्यात आली़ यातून ७९ हजार २४० वसुली झाली़ पाणीपट्टी, घरपट्टी यांची ५०६ प्रकरणे याठिकाणी ठेवण्यात आली यातून ३ लाख ३४ हजार ९१८ रुपयांची वसुली झाली़