शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

143 कारखाने धोकेदायक श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:03 IST

जागतिक पर्यावरण दिन लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोठय़ा उद्योगांची वानवा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण 439 छोटेमोठे उद्योग आहेत़ ...

जागतिकपर्यावरण दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोठय़ा उद्योगांची वानवा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण 439 छोटेमोठे उद्योग आहेत़ या उद्योगांच्या तपासण्या गेल्या 10 वर्षात पूर्णपणे रखडल्या असून प्रदूषण नियंत्रण मंडळही नावालाच भेटी देत असल्याने कारखान्यांचे सांडपाणी आणि त्यातून होणा:या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आह़े    जिल्हानिर्मितीनंतर येथे मोठे उद्योग येऊन भरभराट होईल अशी अपेक्षा होती़ परंतू गत 20 वर्षात जे कारखाने सुरु आहेत़ त्यातून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे समोर आले आह़े बहुतांश उद्योग हे छोटय़ा स्केलवर चालवले जात असले तरी त्यातून सोडले जाणारे सांडपाणी आणि वायू यामुळे प्रदूषण होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर आले आह़े जिल्ह्यात एकूण उद्योगांपैकी 143 उद्योग हे रेड झोनमध्ये आहेत़ यात अक्कलकुवा 1, तळोदा 1, शहादा 51, नंदुरबार 62 तर नवापूर तालुक्यात 28 उद्योग आहेत़ प्लास्टिकपासून विविध साधने तयार करण्यासाठी रासायनिक उद्योगांच्या या फॅक्टरांच्या तपासण्या करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथे 20 वर्षात अधिकारीच नियुक्त केलेला नसल्याने या कारखान्यांच्या पाईपांमधून नदी-नाल्यात दिवसढवळ्या सांडपाणी सोडले जात असल्याची स्थिती आह़े यातून अनेक नाले जलप्रदूषणाचे स्त्रोत बनले आहेत़ 

शासनाने निर्धारीत बंदी घातलेल्या व प्रदूषणास धोकेदायक ठरणा:या प्लास्टिकच्या पिशव्यांचा शहरी भागात सर्रास वापर होतो़़ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांनी केवळ तीन वेळा नंदुरबार पालिकेच्या सहाकार्याने पिशव्या जप्त केल्या़ त्यानंतर मात्र कारवाई झालेली नाही़ शहादा शहरातही बंदी असलेल्या पिशव्या नागरिकांना विक्रेते सहज देत असल्याचे सातत्याने दिसून आले आह़े नंदुरबार जिल्ह्यात साखर हंगामात पुरुषोत्तमनगर ता़ शहादा, डोकारे ता़ नवापूर येथे सहकारी तर समशेरपूर ता़ नंदुरबार येथे खाजगी तत्त्वावर साखर कारखाना चालवण्यात येतो़ या कारखान्यांची वार्षिक तपासणी धुळे येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून करण्यात येत़े कारखान्याच्या चिमणीतून सोडण्यात येणा:या धुरामुळे अधिकचे प्रदूषण होऊ नये, यासाठी तिन्ही कारखान्यात धूर सोडतेवेळी धुरांडय़ात पाणी सोडण्यात येत़े यामुळे वातावरणाला हानी पोहोचवणारे घटक कमी होऊन धूर बाहेर पडतो़ तिन्ही कारखान्यांनी पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आह़े तसेच याठिकाणी मळीपासून इथेनॉलचीही निर्मिती होत़े