लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ या शेतकऱ्यांसाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दिला असून हे शेतकरी नवीन पिक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत़जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी शासनाकडून अधिकृतपणे निधी मिळाल्याची माहिती दिली आहे़ यामुळे शेतकरी सुखावले आहेत़ गेल्या वर्षी शासनाकडून घोषणा करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती़ दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कर्जमुक्ती योजनेस अडथळे आले होते़ यातच खरीप हंगामासाठी पीक कर्जाची मागणी शेतकरी करत होते़ परंतु कर्जमुक्ती झालेली नसल्याने त्यांना पीककर्ज घेण्यास अडचणी येत होते़ मात्र गेल्या महिन्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत शासनाकडून कर्जमुक्तीचे कामकाज सुरू झाले होते़ यांतर्गत कर्जमुक्तीचा लाभ पात्र शेतकºयांना देण्यासाठी आधार प्रमाणिकरणाला वेग देण्यात आला असून यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयांसाठी शासनाने मंजूर केलेला निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे़जिल्ह्यातील २४ हजार ७२० थकीत कर्जखात्यांपैकी २२ हजार २८१ खात्यांचे आधारप्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ आधार प्रमाणित झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच खरीप हंगामासाठी नव्याने कर्ज घेता येणार आहे. शेतकºयांनी कर्जमागणीचा अर्ज बँकेकडे सादर करायचा आहे़ समस्या असल्यास तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करण्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे़ गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची अपेक्षा आहे़ शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा करुन त्या खात्यांना नील प्रमाणपत्र देऊन पुन्हा नव्याने कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे़शासनाकडून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ११८ लाभार्थी शेतकºयांसाठी ६५ कोटी ५ लाख तर इतर बँकांच्या ३ हजार ८०२ लाभार्थींना ३४ कोटी १९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे वितरण पात्र लाभार्थींच्या बँक खात्यांवर करुन त्यांची खाती नील केली जातील़
जिल्ह्यातील १३ हजार शेतकरी कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:35 IST