शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

पोलिसांच्या युथ पार्लमेंट स्पर्धेत 13 संघ सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात शाळा महाविद्यालयात पोलीस महासंचालक युथ पार्लमेंट वक्तृत्व स्पर्धा-2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े स्पर्धेवर शहादा येथील विकास हायस्कूलच्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केल़े प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे उपस्थित होत़े स्पर्धेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात शाळा महाविद्यालयात पोलीस महासंचालक युथ पार्लमेंट वक्तृत्व स्पर्धा-2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े स्पर्धेवर शहादा येथील विकास हायस्कूलच्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केल़े प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे उपस्थित होत़े स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे, प्रा़ माधव कदम, प्रा़ श्रीराम दाऊतखाने यांनी केल़े यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांनी स्पर्धा आयोजनाचा मूळ हेतू स्पष्ट केला़ स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील 13 संघांनी सहभागी घेतला़ यात निवड झालेल्या प्रथम आणि द्वितीय संघाची नाशिक येथे होणा:या परिश्रेत्रीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली़ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनात या ह्या स्पर्धा घेण्यात आल्या़ आठवी ते 12 वीच्या विद्याथ्र्यासाठी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले होत़े दहशतवाद, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, शैक्षणिक दबावातून विद्यार्थी आत्महत्या, सोशल मिडियाचा दुरूपयोग, जातीयवाद, वामपंथी उग्रवाद, सांप्रदायिकता, आर्थिक गुन्हेगारी, मादक द्रव्यांचे सेवन, मानवी तस्करी, वाहतूक अनुपालक, दुष्काळ व त्याचे सुव्यस्थेवरील परिणाम, औद्योगिक व इतर बंद अशा विविध विषयांवर विद्याथ्र्यानी परखडपणे मते नोंदवत भाष्य केल़े स्पर्धेत शेठ व्हि़क़ेशाह विद्यामंदिर शहादा (उत्कृष्ट संघ-प्रथम), श्रॉफ हायस्कूल व अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु कॉलेज, नंदुरबार (द्वितीय-उत्कृष्ट संघ), प्रथम उत्कृष्ट वक्ता अरशान मजीद खान पठाण-अँग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबार, उत्कृष्ट स्पीकर द्वितीय करिना मेरसिंग पावरा, चावरा इंग्लिश मेडियम स्कूल नंदुरबार, उत्कृष्ट स्पीकर तृतीय कुमुदिनी अजित लांडगे-एकलव्य विद्यालय, नंदुरबार यांना पारितोषिके देण्यात आली़स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या तीन उत्कृष्ट वक्त्यांना पारितोषिक देण्यात आल़े प्रथम दोन संघांना फिरती ढाल तर उत्कृष्ट वक्त्यांना जिल्हाधिकारी यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला़ विजेत्यांचे पोलीस दलाकडून कौतूक करण्यात आल़े यशस्वीतेसाठी पोलीस उपअधिक्षक विजय सोनवणे, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, विनोद जाधव, पोलीस नाईक नरेंद्र पाटील, गोपाल चौधरी, प्रमोद सोनवणे, जितेंद्र अहिरराव, भटू धनगर, राहुल भामरे, किरण मोरे, पंकज महाले, जितेंद्र ठाकूर यांनी परिश्रम घेतल़े कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े