शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

11 कार्यालयांचे कामकाज धुळ्यातूनच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:02 IST

राज्य कर्मचारी महासंघ : नंदुरबारात सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नंदुरबार :  जिल्हानिर्मितीनंतर 21 वर्षातही 11 विभागांची कार्यालये नंदुरबारात सुरू झालेली नाहीत. धुळे येथूनच या विभागांचे कामकाज सुरू आहे. तातडीने ही कार्यालये नंदुरबारात सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे  करण्यात आली आहे.राज्य कर्मचारी महासंघाने याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रय} केला आहे. याबाबत महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, 1998 मध्ये जिल्हा निर्मितीनंतर अनेक कार्यालय सुरू झाली. परंतु 21 वषरानंतरही 11 विभागांची कार्यालये सुरू झालेली नाही. त्यात औषध प्रशासन विभाग, वैद्य मापन शास्त्र विभाग, जलसंपदा विभाग (कार्यकारी अभियंता पाटबंधारे) वनविभाग, कामगार न्यायालय, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय, जिल्हा मत्स्य व्यवसाय विभाग, रिमांड होम व शिशू गृह, विभागीय डाक कार्यालय अािण जलसंधारण विभाग यांचा समावेश आहे. कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने वेळोवेळी शासनाकडे याबाबतच्या कार्यवाहीची मागणी केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार व प्रधान सचिव यांनी लेखी पत्राद्वारे महासंघाला कार्यवाही सुरू असल्याचे सुचीतही केले होते. महासंघाने याबाबत पुन्हा मुख्यमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व संबधीत विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. 11 कार्यालयांचे कामकाज धुळ्याहून सुरू असल्यामुळे संबधीत विभागाच्या कामांकडे दुर्लक्ष होते तर नागरिकांची कामानिमित्त धुळे येथे जाण्यासाठी फरफट होते. काही विभागांचा कारभार हा प्रभारींवर देखील सुरू आहे. त्यामुळे तातडीने संबधीत 11 कार्यालये सुरू करावी अशी मागणी आहे.