शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शनात 108 उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : पळसून, ता.नवापूर येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयात           39 वे नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ              जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात               आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : पळसून, ता.नवापूर येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयात           39 वे नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ              जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात               आला. या प्रदर्शनात विद्याथ्र्यानी            108 उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे.नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा  मुख्याध्यापक संघ, पंचायत समिती शिक्षण           विभाग नवापूर आणि नवजीवन माध्यमिक विद्यालय पळसून यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय             विज्ञान प्रदर्शन पळसून येथे          आयोजित करण्यात आले                  आहे.या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख            पाहुणे म्हणून माजीमंत्री माणिकराव गावीत, पंचायत समिती सभापती सविता गावीत, माजी जिल्हा           परिषद समाजकल्याण सभापती चापडू गांगुर्डे, माजी सरपंच जालमसिंग गांगुर्डे, सरपंच चंद्रकला कोकणी, उपसरपंच शांतीलाल गांगुर्डे, संस्थाध्यक्ष मोतीलाल गांगुर्डे, संचालक गुलाबराव अहिरे, प्रमिला गांगुर्डे, चिलाबाई गांगुर्डे, गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री माणिकराव गावीत होते.याप्रसंगी उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना जिल्हा      परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक  यांनी सांगितले की, आजचे युग हे विज्ञान युग असून, सुप्त गुणांना वाव देवून आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याचा काळ आहे. दैनंदिन जीवनात घडणा:या नाटय़मय घडामोडींकडे डोळसपणे पाहून हे असे का? या मागे शोधकृती बाळगण्याचे आवाहन केले. मानवी जीवनात शिक्षणास महत्त्व असून, प्रामाणिकपणे अध्ययन करून विज्ञानात गोडी निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी विज्ञान शिक्षकांनी प्रय} करण्याचे आवाहन केले.पंचायत समितीच्या सभापती सविता गावीत यांनी विज्ञानामुळे जागतीक परिवर्तन होत असल्याचे सांगून. विद्याथ्र्यानी विद्यार्थी दशेपासूनच विज्ञानात गोडीनिर्माण करून घेवून बालवैज्ञानिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्षिय भाषणात माजीमंत्री माणिकराव गावीत यांनी पळसून सारख्या ग्रामीण भागातील शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्कृष्ठपणे भरविल्याबद्दल कौतुक करून प्रदर्शनात मांडलेले उपकरणे पाहून समाधान व्यक्त केले.कार्यक्रमास तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ, सचिव सुनील भामरे, विद्यासचिव रवींद्र वाघ, सहविद्या सचिव एम.एन. सूर्यवंशी, अंबालाल पाटील, गोपाल पवार, चंद्रकांत गावीत, संजय जाधव, एस.एन. दशपुते, धर्मेद्र वाघ, दिनेश बिरारीस, जगदीश शिंदे, सुनीता गावीत,  सावित्री वळवी आदी उपस्थित        होते.प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे तर सूत्रसंचालन पी.जी. भारती यांनी केले. आभार सुनील भामरे यांनी मानले. या वेळी   प्रदर्शनात प्राथमिक गटात 45, माध्यमिक गटात 56, शिक्षक गटातून पाच, प्रयोगशाळा परिचर गटातून दोन अशी एकूण 108 उपकरणे मांडली आहेत.