शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मतदारसंघात शतप्रतिशत सिंचन हेच आपले व्हिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पहिल्या पंचवार्षीकला निवडून आल्यानंतर आपण मुलभूत गरजा आणि प्रश्न यांना प्राधान्य दिले. आता मतदारसंघात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पहिल्या पंचवार्षीकला निवडून आल्यानंतर आपण मुलभूत गरजा आणि प्रश्न यांना प्राधान्य दिले. आता मतदारसंघात शतप्रतीशत सिंचन आणि विकास याला प्राधान्य राहणार असल्याची माहिती नवनियुक्त खासदार डॉ.हिना गावीत यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.खासदार डॉ.हिना गावीत यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार यांनी त्यांचे स्वागत  केले. यावेळी त्यांनी येत्या पाच वर्षात मतदारसंघात करण्यात येणा:या कामांची माहिती देत दरडोई उत्पन्नात आणि मानव निर्देशांकात जिल्हा वरच्या क्रमावर कसा जाईल यादृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, गेल्या पंचवार्षिकला निवडून आल्यानंतर मतदारसंघातील रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छता या मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देवून त्या दृष्टीने काम केले. रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात यश आले. गाव, पाडय़ार्पयत वीज पोहचली गेली. अनेक भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वीत केल्या. केंद्र शासनाच्या योजनेतून साडेसहा लाख लोकांना विविध योजनांचा लाभ दिला. पहिलीच टर्म असल्यामुळे या मुलभूत प्रश्नांविषयी आपण जागृत राहिलो. आता दुसरी टर्म ही विकासाचे व्हिजन घेवून काम करणारी राहणार आहे. यात प्रामुख्याने सिंचनाचा प्रश्न हा आपला पहिला अजेंडा राहणार आहे. मतदारसंघात शतप्रतिशत सिंचनासाठी आपले मायक्रो प्लानिंग सुरू आहे. जिल्ह्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे मंत्री असतांना मोठय़ा प्रमाणावर सिंचन प्रकल्प पुर्ण झाले. परंतु या प्रकल्पांच्या वितरिका आणि इतर कामे अपुर्ण राहिले आहेत. अर्थात कमांड ऐरिया डेव्हलपमेंट बाकी आहे. आता ही कामे पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरदार सरोवर पाणी वाटप करारातील दहा टीएमसी पाणी घेण्यासाठी प्रय} राहील. सातपुडय़ातून बोगदा खणून नर्मदेचे पाणी आणण्याचा प्रोजेक्टला चालना देणार आहे. यामुळे तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नंदुरबार तालुक्यांचा त्याचा लाभ होणार आहे. उकईचे पाच टीएमसी पाणी उचलून नवापूर तालुक्यात त्याचा लाभ देणार आहे. सुलवाडे बॅरेजमधून पाणी उचलून ते शिरपूर तालुक्यातील शेवटच्या टोकार्पयत पोहचविण्यासाठी देखील योजना तयार करण्यासाठी संबधीत विभागाला सुचना दिल्या आहेत. शेतक:यांच्या शेतात पाणी पोहचले तर उत्पन्न वाढले. त्याचा फायदा दरडोई उत्पन्न वाढण्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरे व्हिजन आपले विकासाचे राहणार आहे. त्यात औद्योगिक आणि शैक्षणिक विकास याला प्राधान्य राहणार आहे. औद्योगिक विकास अंतर्गत स्कील डेव्हलपमेंटला आपण प्राधान्य देणार आहोत. याअंतर्गत येणा:या कंपन्यांनी स्थानिक ठिकाणचेच अकुशल कामगार घेवून त्यांना कुशल करणे अपेक्षीत आहे. नवापूर येथील एमआयडीसीत टेक्स्टाईल झोन सुरू आहे. तेथे 30 ते 35 युनिट सुरू असून त्यात आणखी वाढ कशी होईल यादृष्टीने प्रय} सुरू आहेत. नंदुरबारातील एमआयडीसीला चालना देण्यात येत आहे.

‘लोकमत’ने सखी पुरवणीत महाराष्ट्रातील महिला खासदारांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी विशेष लेख प्रसिद्ध केला होता. या सखी पुरवणीचे प्रकाशन खासदार डॉ.हिना गावीत यांनी केले. या प्रकाशनानंतर त्यांनी प्रसिद्ध लेखावर नजर फिरवली आणि आपल्या मैत्रीणींच्या आठवणीत रमल्या. महाराष्ट्रातून विजयी झालेल्या आठही महिला खासदार आम्ही एकमेकांच्या मैत्रीणी असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत पक्ष भेद विसरून काही काळ आम्ही एकत्र येतो. विविध विषयांवर आमच्या गप्पा होतात. राजकारणापासून तर कौटूंबिक चर्चा करून आम्ही एकमेकांचे मन हलके करतो. पूर्वीच्या मैत्रणींमध्ये आता नवनीत राणा व भारती पवार यांची भर झाली आहे पण त्याही आपल्या पुर्वीच्याच मैत्रणी असल्याचे डॉ.हिना गावीत यांनी यावेळी सांगितले. 

नंदुरबारला लवकरच विमानतळाचे काम सुरू करणार

जिल्हा महामार्गानी जोडला गेला आहे. आता हवाई मार्गाने देखील जोडला जावा यासाठी प्रय} सुरू आहेत. त्याचअंतर्गत नंदुरबारात विमानतळ सुविधा करण्यासाठी आपला प्रय} सुरू असल्याचे खासदार डॉ.हिना गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.‘लोकमत’संवाद उपक्रमात बोलतांना खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या, नंदुरबार जिल्हा सहा महामार्गानी जोडला गेला आहे. रस्त्यांचे आणि महामार्गाच जाळे तयार होत आहे. रेल्वेचे दुहेरीकरण झाल्याने गाडय़ा वाढल्या आहेत. यामुळे रस्ते मार्गाने जिल्हा जोडला गेला आहे. आता जिल्हा हवाईमार्गाने देखील जोडला जावा यासाठी प्रय} सुरू आहेत. नंदुरबारात विमानतळ व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यासाठी दोन ते तीन जागांची पहाणी करण्यात आली आहे. रनाळा भागातील जमीन पहाणी झाली. परंतु त्या भागात डोंगर व टेकडय़ांची  जमीन आहे. विमानतळासाठी सपाट जमीन लागत असल्यामुळे दुस:या भागातील जमिनीचा शोध घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचे डॉ.हिना गावीत यांनी सांगितले. पासपोर्ट कार्यालयनंदुरबारात लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वीच ते सुरू झाले असते. परंतु काही अडचणी आल्याने ते होऊ शकले नाही. पुढील टप्प्यात नंदुरबारात पासपोर्ट कार्यालय कार्यान्वीत करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.महामार्गाचे जाळेनंदुरबारातील सहा महामार्ग  मंजुर आहेत. पैकी नागपूर-सुरत महामार्गाचे कामाची बरीच प्रगती झाली आहे. थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी संबधीत विभागांच्या अधिका:यांशी दोन दिवसांपूर्वीच  चर्चा झाली असून लवकरच उर्वरित काम देखील पुर्ण करण्यात येणार आहे.विसरवाडी-सेंधवा महामार्गाच्या कामाला देखील वेग दिला जात आहे. कोळदा-खेतिया महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अंकलेश्वर-ब:हाणपुर महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. शेवाळी-नेत्रंग महामार्ग आणि सोनगीर-धडगाव महामार्ग देखील लवकरच करणार असल्याचे सांगितले.    

केंद्राच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्था येथे आणल्या. रुसा अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज मंजुर करून घेतले आहे. केंद्रीय विद्यालय मंजुर असून लवकरच सुरू होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या दुस:या युनिटसाठी जागा व इमारत मंजुर करून काम पुर्णत्वाकडे आहे. आंतरराष्ट्रीय शाळा तोरणमाळ येथे सुरू करण्यात आली आहे. एकलव्य रेसीडन्सीएल स्कूल अक्कलकुवा, तळोदा व साक्री येथे मंजुर करण्यात आले आहेत. आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपला प्रय} आहे. तीन टप्प्यात हे महाविद्यालय सुरू करावे लागणार आहे. पहिला टप्पा हा हॉस्पीटल हस्तांतरणाचा होता तो पुर्ण झाला आहे. दुसरा टप्पा अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी भरण्याचा राहील तर तिसरा टप्पा हा इमारती आणि इतर सुविधा उभारण्याचा आहे. त्यादृष्टीने प्रय} सुरू असल्याचे खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले. 

रेल्वेच्या सुविधा उपलब्ध करून देतांना दिल्लीत सतत पाठपुरावा केला. दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले. मुंबईसाठीची गाडी सुरू करण्यात आली. आता पुण्यासाठीची गाडी सुरू करण्याकरीता प्रयत्न सुरू आहेत. नंदुरबारात रॅक पॉईंट मंजुर झालेला आहे. परंतु साठवणुकीसाठी सुविधा नाहीत. त्यामुळे आवश्यक ते गोदामे उभारून येथील रॅक पॉईंट लवकरात लवकर कार्यान्वीत कसा होईल यादृष्टीने प्रय} सुरू आहेत. एफ.एम.केंद्र मंजुर झाले. परंतु दोन वेळा निविदा काढूनही कुणी निविदाच भरल्या नाहीत. आता नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. ती भरली जावी यासाठी प्रय} सुरू आहेत.