शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

32 पैकी 10 सरपंच निवड बिनविरोध : शहादा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 11:59 IST

सदस्यांच्या 123 जागांसाठी 398 उमेदवार रिंगणात

शहादा : तालुक्यात 32 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशन अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसअखेर 32 पैकी 10 ग्रा.पं.चे सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित 22 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणार आहेत. 266 ग्रा.पं. सदस्यांच्या जागांपैकी 124 सदस्य बिनविरोध तर 19 जागांसाठी  नामनिर्देशन अजर्च दाखल झालेले नाहीत. उर्वरित 123 जागांसाठी 398 उमेदवार रिंगणात आहेत. नऊ ग्रा.पं.च्या सदस्यांच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत.तालुक्यात जनतेतून थेट सरपंच निवडणूक प्रथमच होत आहे. 32 ग्रा.पं.ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. माघारीनंतर या ग्रा.पं. निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत लांबोळा, करजई, तितरी, सावळदा, वाघर्डे, वाघोदा, कमरावद, उजळोद, पिंप्री व नवानगर या 10 ठिकाणची सरपंच निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित 22 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच करजई, तितरी, वाघर्डे, वाघोदा, कमरावद, उजळोद, नवानगर, पिंप्री, लांबोळा याठिकाणच्या सदस्यपदाच्या सर्व जागाही बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यात 32 ग्रा.पं.च्या 266 जागांपैकी 124 जागा बिनविरोध झाल्या तर 19 जागांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल न झालेले नाहीत. त्यामुळे सदस्यपदाच्या उर्वरित 123 जागांसाठी 398 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 26 सप्टेंबरला मतदान होणार असून 27 सप्टेंबर रोजी शहरातील तैलिक मंगल कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मनोज खैरनार हे काम पाहत असून त्यांना नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, किशोर भानदुर्गे, किशोर महाजन हे सहकार्य करीत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक म्हणजे जि.प. निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.सातपुडा साखर कारखान्याकडून उसाला 2200 दर निश्चितसर्वसाधारण सभा : गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाचा भावलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गाळप हंगाम 2017-18 साठी जाहीर केलेला ऊस दर एफआरपीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी व कारखान्याचे हित जोपासण्यासाठी प्रतीटन दोन हजार 200 रुपये दिलेला भाव   देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.साखरेचे भाव खूपच खाली आल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणेही शक्य झाले नाही. ऊस गाळप करणे परवडत नसल्याने अनेक कारखान्यांनी हंगाम संपण्यापूर्वीच ऊस गाळप बंद केले होते. मात्र सातपुडा साखर कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप केला. सुरुवातीला पहिला हप्ता म्हणून नोंद उसाला 2100 रुपये प्रतीटन अदा केला आहे तर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दुसरा हप्ता आणखी प्रतीटन 100 रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. तर उर्वरित तिसरा हप्ता प्रतीटन 200 रुपयांप्रमाणे जाहीर केलेला असला तरी कारखान्याचे आर्थिक पत्रकानुसार कारखान्यास जास्तीचा नऊ कोटी रुपये तोटा सहन करावा लागेल म्हणून उर्वरित 200 रुपयांचा तिसरा हप्ता देणे शक्य होणार नसल्याने हंगाम 2017-18 साठी नोंद उसासाठी अंतिम ऊस दर 2200 रुपये प्रतीटन प्रमाणे निश्चित करावा, असा ठराव चेअरमन दीपक पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत मांडला होता. त्यास सभासदांनी मंजुरी दिल्याने कारखान्याचा तोटा कमी करता येणे शक्य होणार आहे. एफआरपी दोन हजार 18 रुपये बसत असताना कारखान्याने 182 रुपये जादा देऊन सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.