शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सौरकृषी पंपासाठी 1 हजार शेतक:यांनी दाखल केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:03 IST

बोरद : राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागातून 1 हजार 100 शेतक:यांनी ...

बोरद : राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागातून 1 हजार 100 शेतक:यांनी अर्ज दाखल केले आहेत़ योजनेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून लवकरच शेतक:यांना अधिक क्षमतेच्या मोटारी मिळणार आहेत़ कृषी क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून सौरकृषी पंपांची योजना अंमलात आणली गेली आह़े यांतर्गत शेतक:यांना 3 आणि 5 हॉर्सपावरच्या पाणमोटारी कोटेशन रक्कम भरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ 3 हॉर्सपावरची मोटार साधारण 2 लाख 55 तरर 5 हॉर्सपावरची मोटार साधारण 3 लाख 65 हजार रुपयांची आह़े यासाठी शेतक:यांना नाममात्र रक्कम भरण्याचे अट आह़े गेल्या महिनाभरापासून शहादा विभागातील वीज कंपनीच्या कार्यालयांमध्ये या योजनेच्या कामाला गती आली असून अर्जाची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े शेतक:यांच्या सोयीची योजना असल्याने त्यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात येत असल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आह़े यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतीसिंचनासाठी वाढीव क्षमतेच्या मोटारींची गरज असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े यासाठी योजनेत सहभाग वाढत असल्याचे दिसून आले आह़े सातबारा, कूपनलिका, विहिरीचा पुरावा, आधारकार्ड आणि जातीचा दाखला देत शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करुन दिले आहेत़ यात तीन हॉर्सपावरची मोटार हवी असलेल्या अनुसुचित जाती व जमातीच्या शेतक:यांना 12 हजार 700 तर पाच हॉर्सपावरच्या मोटारीसाठी 19 हजार 250 रुपये भरावे लागणार आहेत़ सर्वसाधारण संवर्गातील शेतक:यांना 3 हॉर्सपावरसाठी 25 हजार 500 तर पाच हॉर्सपावरच्या मोटारीसाठी 38 हजार 500 रुपये भरावे लागणार आहेत़ ही रक्कम भरुन चांगल्या दर्जाच्या मोटारी मिळून शेतीसिंचन होणार असल्याने शेतक:यांकडून प्रतिसाद दिला जात आह़े  खासकरुन दुर्गम भागातील शेतक:यांचा शेतक:यांचा या योजनेकडे ओढा असल्याचे वीज कंपनीच्या कार्यालयातील वाढत्या गर्दीवरुन दिसून येत आह़े