शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

नंदुरबारातील 1 हजार 554 सावित्रीच्या लेकी सायकलीच्या अनुदानापासून वंचित

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: January 10, 2018 12:54 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी शिक्षणाच्या गंगेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना सायकल खरेदीसाठी 3 हजार रुपयांचे अनुदान मानव विकास मिशन योजनेअंतर्गत देण्यात येत असत़े या योजनेअंतर्गत 2017-2018 या शैक्षणिक वर्षात तब्बल 1 हजार 554 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आह़े परंतु शैक्षणिक वर्ष संपण्यात आल्यावरील संबंधित ...

ठळक मुद्देतालुकानिहाय लाभाथ्र्याची संख्या जिल्ह्यात एकूण 1 हजार 554 विद्यार्थिनींची या योजनेसाठी निवड करण्यात आली आह़े त्यात, अक्कलकुवा 289, धडगाव 86, तळोदा 147, नवापूर 363, नंदुरबार 299 तर शहादा 370 अशा 1 हजार 554 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आह़े त्यामुळे या

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी शिक्षणाच्या गंगेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना सायकल खरेदीसाठी 3 हजार रुपयांचे अनुदान मानव विकास मिशन योजनेअंतर्गत देण्यात येत असत़े या योजनेअंतर्गत 2017-2018 या शैक्षणिक वर्षात तब्बल 1 हजार 554 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आह़े परंतु शैक्षणिक वर्ष संपण्यात आल्यावरील संबंधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळाली नाही़ हे अनुदान जिल्हा नियोजन समितीकडे मिळालेले आह़े त्यानंतर ट्रेझरीमार्फत गटशिक्षण अधिकारी व नंतर संबंधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होणे अपेक्षीत असत़े परंतु अद्याप हे अनुदान  प्रशासनाच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर वर्गच झाले नसल्याची माहिती आह़े त्यामुळे प्रशासन चालढकल करतय की काय? असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आह़े एकीकडे मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आह़े तर, दुसरीकडे मात्र विद्यार्थिनींना योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आह़े  जिल्हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने या ठिकाणी शासकीय योजनांचे महत्व अनन्यसाधारण आह़े त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरीत निधी वर्ग करण्याची मागणी आह़े

काय आहे योजना?..

जिल्ह्यातील दुर्गम भागातील 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थिनींसाठी ही योजना आह़े ज्यांच्या घरापासून शाळा 5 किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहे, तसेच तेथे बसेसच्या सोयीसुविधा नाहीत अशा विद्यार्थिनींची शालेय व्यवस्थापनाकडून योजनेसाठी निवड करण्यात येत असत़े तो प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात येत असतो़ त्यानुसार जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थिनींचे बँक खाते उघडण्यात येत असत़े पहिल्या हप्त्यात 2 हजार रुपयांचा निधी देण्यात येत असतो़ त्यानंतर सायकल खरेदी केल्याची पावती शालेय व्यवस्थानाकडे सादर केल्यानंतर, सायकलची खरेदी झाली आहे याची शहानिशा झाल्यानंतर पुढील 1 हजार रुपयांचे अनुदान विद्यार्थिनींच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असत़े लाभार्थी प्रत्येक विद्यार्थिनीला 3 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असत़े विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम न व्हावा यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून मानव विकास मिशनअंतर्गत सायकल खरेदीसाठी हे अनुदान देण्यात येत असत़े परंतु अद्यापही त्याची रक्कम बँक खात्यात जमा होत नसल्याने काहीशा अडचणींचा सामना करावा लागत आह़े विशेष म्हणून शैक्षणिक वर्ष संपण्यात आल्यावरही अनुदान मिळण्यास विलंब का होतोय याचे आश्चर्य अनेकांना वाटत आह़े त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आह़े