शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

झीरो पोलिसाच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:47 IST

दारु विक्रेत्याकडून पोलीस अधिका-याच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळणा-या मसरत आलम ऊर्फ मुन्ना याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ शुक्रवारी वजिराबाद पोलिसांनी मुन्नाला न्यायालयात हजर केले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दारु विक्रेत्याकडून पोलीस अधिका-याच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळणा-या मसरत आलम ऊर्फ मुन्ना याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ शुक्रवारी वजिराबाद पोलिसांनी मुन्नाला न्यायालयात हजर केले होते़तामसा येथील मसरत आलम ऊर्फ मुन्ना हा स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षे झीरो पोलीस म्हणून कार्यरत होता़ नोकरीचे आमिष दाखवून एका जणाला गंडविल्याच्या प्रकरणात त्याच्यावर हदगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यानंतर मुन्नाने नांदेड शहरातील एका दारु विक्रेत्याची गाडी अडवून सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळली होती़ याप्रकरणी दारु विक्रेत्याने वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यानंतर वजिराबाद पोलिसांनी हदगाव पोलिसांकडून मुन्नाला ताब्यात घेवून त्याला न्यायालयात हजर केले होते़ न्यायालयाने त्याला यापूर्वी १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ त्यानंतर शुक्रवारी पुन्हा मुन्नाला न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आता सोमवारपर्यंत वाढ केली आहे़ दरम्यान, मुन्नाच्या चौकशीत आणखी कुणाची नावे समोर आली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़