प्रशासनाला दरराेज २ हजार तपासण्यांचे उद्दिष्ट असताना त्याच्या २५ टक्केच तपासण्या होत आहेत. मंगळवारी प्रशासनाला ५७१ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी ५५५ जण निगेटिव्ह आले. तर नांदेड महापालिका हद्दीतील पाच जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९, मनपाअंतर्गत गृहविलगीकरणात १४, ग्रामीण भागात गृहविलगीकरणात ६ आणि खाजगी रुग्णालयात चार जण उपचार घेत आहेत.
तिघांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ८७ हजार ६०३ झाली आहे. उपचार घेत असलेल्या ३३ जणांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय या दोन्ही ठिकाणी मुबलक प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.