शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वारातीम’चा २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान युवक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 20:00 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा यावर्षीचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा-२०१७’ विष्णूपुरी येथील ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला  आहे.

ठळक मुद्देपाच मंचांवर २८ कलाप्रकारांचे सादरीकरण होणार

नांदेड :   स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा यावर्षीचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा-२०१७’ विष्णूपुरी येथील ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला  आहे. ही माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ़ राजेश्वर दुडूकनाळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली़ महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश शिरसाठ यांच्या हस्ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे़ अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर राहणार आहेत. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, प्र- कुलगुरू डॉ़ गणेशचंद्र शिंदे, संतबाबा बलविंदरसिंघजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ स्वागताध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, प्राचार्य डॉ़ विजय पवार  हे आहेत़ २३ सप्टेंबर रोजी सकाळी सोडसात वाजता ‘जागर लोकशाही मूल्यांचा’ या विषयावर शोभायात्रा निघणार आहे़ साडेदहा वाजता उद्घाटन समारंभानंतर विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले जाणार आहे़ एकूण पाच मंचांवर संगीत, नृत्य, नाट्य, वाड़्मयीन, ललित कला आणि महाराष्ट्राची लोककला या कला प्रकारातील कलेचे सादरीकरण होणार आहे़ मंचाना भारतरत्न डॉ़ ए़ पी़ जे़ अब्दुल कलाम, निळू फुले, पद्मश्री मोहमंद रफी, कॉ़ गोविंद पानसरे मंच व रवींद्रनाथ टागोर यांची नावे देण्यात आली आहेत़ विविध २८ कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे़ 

 स्पर्धक व प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध समित्यांचे गठन केले आहे़ महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा २६  सप्टेंबर रोजी होणार आहे़ यावेळी कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर, महाराष्ट्र राज्य मॉडेल व्हीलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार, डॉ़ महेश शिवणकर, ज्येष्ठ कवी प्रा़ लक्ष्मीकांत तांबोळी यांची उपस्थिती राहणार आहे़ पत्रपरिषदेस प्राचार्य डॉ़ विजय पवार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांची उपस्थिती होती.