शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

शोधमोहिमेच्या दोन दिवसांत कुष्ठरोगाचे ५१, तर क्षयरोगाचे २९ संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

कंधार : तालुक्यात १ डिसेंबरपासून संयुक्त कुष्ठ व क्षयरोगाची शोधमोहीम राबविली जात आहे. पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतंर्गत असलेल्या गावांत ...

कंधार : तालुक्यात १ डिसेंबरपासून संयुक्त कुष्ठ व क्षयरोगाची शोधमोहीम राबविली जात आहे. पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतंर्गत असलेल्या गावांत २ दिवसांत ६ हजार १५० कुटुंबांना आरोग्य पथकाने भेट दिली. त्यात कुष्ठरोगाचे ५१ व क्षयरोगाचे २९ संशयित रुग्ण आढळले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या शोधमोहिमेतून समोर आली आहे. सर्वाधिक कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण बारूळ व पेठवडज केंद्रांतर्गत गावात प्रत्येकी १७ आढळले आहेत.

तालुक्यात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत घरोघरी भेट देऊन संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात येत आहे. एकूण २ लाख १० हजार लोकसंख्या व ४० हजार ६४० कुटुंबांना २४५ आरोग्य पथके भेट देत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक शेख शादूल, कुष्ठरोग तंत्रज्ञ ई.बी. पठाडे, क्षयरोग पर्यवेक्षक एस.ए. मुक्कनवार, सिंधूताई केसाळे यांच्या सूचनेनुसार आशा, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी शोधमोहीम राबवीत आहेत. १ व २ डिसेंबर रोजी २९ हजार १६० लोकसंख्येला व ६ हजार १५० कुटुंबाला पथकाने घरोघरी भेटी दिल्या. त्यात संशयित रुग्ण आढळले असल्याचे समोर आले आहे.

पथके घरोघरी भेट देऊन शोधमोहीम राबवीत आहेत.

कुष्ठरोगाचे त्वचेवर फिकट-लालसर चट्टे असल्यास व त्याजागी घाम येत नसेल, तर त्वचेवर थंड व गरम संवेदना, तळहात-तळपायावर मुंग्या येणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, भुवयांचे केस विरळ होणे, जाड-बधिर -तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड आदी लक्षणे तपासली जात आहेत आणि ही लक्षणे आढळल्यास संशयित म्हणून नोंद घेतली जात आहे. अशा संशयित रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी करतील. यासाठी संदर्भित केले जात आहे. त्यातील संशयित ५१ पैकी १२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास संशयित म्हणून नोंद केली जात आहे. त्यात वजनात लक्षणीय घट, सायंकाळी ताप, थुंकीतून रक्त पडणे व छातीत दुखणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक ताप, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला आदी लक्षणे असल्यास संशयित म्हणून नोंद केली जात आहे आणि त्यांचे स्पुटन गोळा केले जात आहेत. थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. मग निदान केले जाणार आहे. ६ जणांचे स्पुटन घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.