शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

बांध कमर क्यू डरता है, देख प्रभू क्या करता है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 19:10 IST

मी माझ्यासाठी नाही, भक्तांसाठी आहे

ठळक मुद्देसोप्या अन् साध्या भाषेत आशीर्वचनआठ कोटी लिंगायतांना एकत्र आणण्याचा संकल्प

- शिवराज बिचेवार

नांदेड :राष्ट्रसंत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नांदेडकरांवर अनेक दशके आशीर्वादरुपी छत्र होते़ नांदेडात लाखोंच्या उपस्थित झालेला सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताह असो किंवा गावोगावी आपल्या खणखणीत आवाजातील आशीर्वचनाने त्यांनी अनेकांना भक्तीचा मार्ग दाखविला़ लिंगायत धर्ममान्यता आंदोलनाचा नांदेडातूनच शंखनाद केलेल्या अप्पांनी अखेरचा श्वासही नांदेडातच घेतला़ 

१५ ते १७ जानेवारी या काळात जुना मोंढा मैदानावर सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले होते़ दररोज ११ हजार १११ भाविक त्यात परमरहस्य ग्रंथाचे पारायण करीत होते़ त्यावेळी काढलेल्या शोभायात्रेत हत्तीवर स्वार झालेल्या अप्पांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली़  सर्व धर्मातील संत आणि विचारवंतांनीही यामध्ये सहभाग घेतला होता़ मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी दुकानात तर अनेक कुटुंबानी आलेल्या भाविकांच्या ठिकठिकाणी राहण्याची सोय केली़ अशोकराव चव्हाण हे ही त्यावेळी पारायणाला बसले होते़ दिवंगत शंकरराव चव्हाणापासून त्यांचे चव्हाण कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते होते़

आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य केले़ उपचारासाठी पुणे, मुंबई येथे नेण्याची तयारी सुरु असताना त्यांनी मात्र नांदेडलाच उपचार घेण्याचा आग्रह केला़ अप्पा लिंगैक्य झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करणे आवश्यक असल्याची बाब नमूद केली़ त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगेच प्रशासनाला त्याबाबत आदेश दिले़ देशभक्ती नसानसात भिनलेल्या अप्पांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली़ यावेळी लाखो जणांनी साश्रू नयनांनी निरोप दिला़

सोप्या अन् साध्या भाषेत आशीर्वचनमन अस्वस्थ झाल्यानंतर मी लगेच भक्तीस्थळ गाठायचो़ अप्पांच्या सानिध्यात तासन् तास वेगवेगळ्या विषयावर बोलायचो़ अप्पाही न थकता प्रत्येक विषयावर सखोलपणे चर्चा करीत होते़ प्रचंड विद्वत्ता असलेल्या अप्पांच्या सहवासात गेल्यानंतर आयुष्यातील संकटे किंवा इतर सर्व विषयांचा विसर पडत होता़ त्यांचे नेहमीचे एक वाक्य होते़ बांध कमर क्यू डरता है, देख प्रभू क्या करता है़ हिम्मत धरा, संकटांना घाबरु नका, ईश्वर तुमच्या पाठीशी आहे़ अशा पद्धतीने ते धीर देत होते़ त्यामुळे लाखोंच्या उपस्थितीतील त्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन अत्यंत चोखपणे पार पाडण्यासाठी बळ मिळत होते़ सर्वसामान्यांना सहज समजेल आणि उमजेल अशा सोप्या भाषेतील त्यांचे आशीर्वचन ऐकल्यानंतर मन तृप्त होत होते़ अशी प्रतिक्रिया माजी सभापती किशोर स्वामी यांनी दिली़ 

आठ कोटी लिंगायतांना एकत्र आणण्याचा संकल्पपरमपूज्य आप्पाजी हे लिंगायत आंदोलनाचे दिव्य नेतृत्व होते़ अनेक भाषेत आणि अनेक राज्यात विभागालेल्या देशातील आठ कोटी लिंगायतांना एकत्र आणण्याचा त्यांचा संकल्प होता़ तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व जीवन पणाला लावू अशा शब्दात बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अ‍ॅड़अविनाश भोसीकर यांनी श्रद्धांजली वाहिली़ 

मी माझ्यासाठी नाही, भक्तांसाठी आहे कार्यक्रमाची तारीख डायरीत लिहिल्यानंतर अप्पा काही झाले तरी, तो कार्यक्रम चुकवायचे नाही़ बारडला प्रवचनासाठी त्यांनी तारीख दिली होती़ परंतु त्याच्या एक दिवस अगोदरच त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला़ त्यामुळे सर्वांनी त्यांना बारडचा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले़ त्यावर स्पष्टपणे नकार देत मी माझ्यासाठी नाही, भक्तांसाठी आहे़ माझे भक्त माझी वाट पाहत असतील़ तुम्ही फक्त गाडी स्टेजपर्यंत न्या, मला स्टेजवर बसवा अन् पुन्हा गाडीत बसवा एवढेच करा असे सांगितले़ त्यानंतर बारडला हजारो भाविकांसमोर त्यांनी प्रवचन केल्याची आठवणही किशोर स्वामी यांनी सांगितली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकNandedनांदेड