शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माहूरचा रामगड किल्ला नामशेषाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:55 IST

समुद्रसपाटीपासून २ हजार ६०० फूट उंचीवर इ़स़७५८ मध्ये बांधण्यात आलेला ऐतिहासिक रामगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़

नितेश बनसोडे।लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : समुद्रसपाटीपासून २ हजार ६०० फूट उंचीवर इ़स़७५८ मध्ये बांधण्यात आलेला ऐतिहासिक रामगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ गड किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे शासन उदासीन असल्यामुळे पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे़श्रीक्षेत्र माहूर हे भौगोलिकदृष्ट्या १९:४५ उत्तर रेखांश आणि ७७़५३ रेखांश पठारावर असलेला प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे़ या रामगड किल्ल्याला दोन तट आहेत़ हा किल्ला मेल (९ कि़मी़) विस्तार असून डोंगरी किल्ला, गिरी दुर्ग, गौंड किल्ला असे संबोधल्या जाते़ पहिला तट राष्ट्रकुटांनी बांधला तर दुसरा तट रामदेवराव यादव या राजाने बांधला आहे़ विशेष बाब म्हणजे, राष्ट्रकुटांनी देवगिरी किल्ला बांधला व कंधार, माहूर येथील किल्ला हे देखील त्याच कालखंडामध्ये बांधण्यात आले असून बांधकाम शैलीत व वास्तुच्या बाबीवरून साम्य आढळते़प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार भिंत बांधलेली आहे़ मुख्य द्वारापासून पुढे नागमोडी रस्त्याने दुसºया प्रवेशद्वारापर्यंत जाता येते़ मुख्य प्रवेशद्वार १३ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे़ पहिल्या प्रवेशद्वारातून ७२५ फूट अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे़ रामगिरी किल्ल्यातील इजळा जलाशय व दुसरा मातृतीर्थ जलाशय आहे़चोहोबाजूंनी चिरेबंदी बांधकाम असून दोन-दोन कठडे आहेत़ हवामहलची उंची ५३ फूट व लांबी ५२ फूट आहे़ हत्ती दरवाजातून पुढे गेल्यास उजवीकडे पश्चिमेस चिनीमहल बांधलेला आहे़ या ठिकाणीसुद्धा सैनिक तैनात असायचे़ चिनी महलाच्या पश्चिमेस निशाण बुरुजाजवळ दोन मशिदी आहेत़ किल्ल्यामध्ये त्याकाळी जलव्यवस्थापनाची साधने म्हणजे बारव, तलाव, कटोरा बावडी, गौतम झरा आहेत़